सततची गर्दी, विलंब आणि अपुरा प्रतिसाद यामुळे मध्य रेल्वेवरील प्रवास अनेकदा प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरतो. यालाच कंटाळून मध्य रेल्वेच्या निराश झालेल्या प्रवाशाने रेल्वमंत्री अश्विनी वैष्णव (ashwini vaishnav) यांना पत्र लिहीले.
या पत्रानुसार ते म्हणाले, मध्य रेल्वे(central railway) हे देशातील सर्वात व्यस्त रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. पण अनेक समस्यांचा सामना प्रवाशांना करावा लागतो. विशेषत: पावसाळ्यात हा त्रास अधिकच वाढतो. बुधवारी मुसळधार पावसाचा फटका या मार्गाला बसला आणि रात्री लाखो प्रवासी अडकून पडले. तसेच प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला.
विशेषत: याचा परिणाम मुख्य मार्गावरील विद्याविहार आणि ठाणे (thane) आणि हार्बर मार्गावरील गोवंडी आणि मानखुर्द दरम्यानच्या मार्गांवर झाला. ज्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागला.
याउलट, पश्चिम रेल्वे (western railway) सेवा सुरळीत सुरू होती. एकाच शहरात सेवा गुणवत्तेत इतकी लक्षणीय विषमता कशी असू शकते? याचे निराकरण करणे आवश्यक आहे. मध्य रेल्वेच्या 38 लाखाहून अधिक उपनगरीय प्रवाशांसाठी, ही नवीन समस्या नाही. प्रवासी पिढ्यानपिढ्या हा त्रास सहन करत आहेत.
आमच्या तुमच्याकडून अपेक्षा वेगळ्या आहेत कारण तुम्ही ‘नेता’ नसून उच्च शिक्षित आणि अनुभवी नोकरशहा आहात.
मध्य रेल्वेवर अवलंबून असलेल्या 38 लाख प्रवाशांच्या (passanger) सुरक्षित आणि सुरळीत सेेवेसाठी ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. बुधवारी रात्री झालेल्या व्यत्ययाबद्दल विचारले असता, मध्य रेल्वेचे सीपीआरओ डॉ स्वप्नील निला म्हणाले, “प्रत्येक यंत्रणा एका मर्यादेपर्यंत ऑपरेट केली जाऊ शकते. आम्ही प्रणालीच्या सुधारणेसाठी अनेक सुधारात्मक कृती केल्या आहेत. विशेषतः कठीण भूभाग आणि ड्रेनेज पॅटर्नसह मुंबईच्या उपनगरीय विभागातील जुन्या पायाभूत सुविधा असलेल्या भागात देखील आम्ही काम करत आहोत.
तसेच त्यांनी स्पष्ट केले की मध्य रेल्वे प्रति तास 100 मिमी पर्यंतचा पाऊस (mumbai rains) हाताळण्यासाठी तयार आहे. जो मुंबई व उपनगरातील नियमित पावसाच्या 40 टक्के जास्त आहे. परंतु एका तासात यापेक्षा जास्त पाऊस पडल्यावर ट्रॅकवरून पाणी हटवणे अशक्य होते.
“अशा प्रकरणांमध्ये, आम्हाला लांब ट्रॅफिक ब्लॉक्सची गरज भासते, जी शहराच्या दाट नेटवर्कमुळे मुंबईत (mumbai) लागू करणे कठीण आहे.” ते म्हणाले, बुधवारी रात्री, केवळ एका तासात सुमारे 200 मिमीच्या अनपेक्षित पावसामुळे (heavy rains) मुख्य आणि हार्बर दोन्ही मार्गांवर काही काळ रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती.
पश्चिम रेल्वे (western railway) उपनगरीय सेवा सुरू ठेवल्याबद्दल प्रश्न विचारला असता, डॉ निला यांनी स्पष्ट केले की भिन्न टोपोग्राफीमुळे दोन प्रणालींची तुलना होऊ शकत नाही. “आमच्या व्यवस्थेवर सखल भाग आणि आजूबाजूच्या झोपडपट्ट्यांसह नाल्यांच्या प्रवाहांचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. ज्यामुळे पावसाचे पाणी थेट रुळांवर येते,” कुर्ला-ठाणे विभागाच्या पुराच्या वाढत्या असुरक्षिततेबद्दल, त्यांनी आश्वासन दिले की सुधारणा सुरू आहेत.
तसेच ते पुढे म्हणाले की “आम्ही सूक्ष्म टनेलिंग पद्धती वापरून आणि अनेक ठिकाणी पाणी बाहेर काढण्यासाठी पंपाद्वारे आमची ड्रेनेज व्यवस्था सतत सुधारत आहोत. परंतु जेव्हा अतिवृष्टी होते, तेव्हा पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे प्रणाली अपुरी पडते.”
कारण काहीही असो, मध्य रेल्वेवरील मुंबईकर आता थांबू शकत नाहीत. सुरळीत प्रवास करण्यासाठी प्रभावी पावले उचलण्याची वेळ आली आहे. असे मध्य रेल्वेचे प्रवासी कमल मिश्रा रेल्वे मंत्र्यांना लिहीलेल्या पत्राद्वारे म्हणाले.
हेही वाचा