ग्रीनपीस इंडियाच्या ताज्या अहवालानुसार भारतातील सात प्रमुख शहरांमध्ये नायट्रोजन डायऑक्साइड म्हणजेच NO₂ प्रदूषणाची (pollution) पातळी वाढली आहे. त्यामुळे या शहरात राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच मुंबईतील (mumbai) नायट्रोजन डायऑक्साइडची (NO₂) वाढलेली पातळी चिंताजनक आहे.
नायट्रोजन डायऑक्साइड (NO₂) हा एक विषारी वायू आहे. जो इंधन जाळल्यावर त्यातून उत्सर्जित होऊन हवेत मिसळतो. यामुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. शहरी भागात या विषारी वायूचे प्रमाण सामान्य आहे.
WHO च्या 2023 च्या अहवालानुसार शहरातील नायट्रोजन डायऑक्साइडचे प्रमाण 24 पैकी 22 पर्यंत ओलांडले होते.
मालाड पश्चिम येथे 82µg/m3 इतकी नायट्रोजन डायऑक्साइडची सर्वोच्च पातळी नोंदवली गेली होती. त्यानंतर बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या बस डेपोजवळ 68µg/m3 इतकी पातळी नोंदवली गेली होती. माझगाव आणि सायन भागात वार्षिकरित्या 70 टक्क्यांहून जास्तीची मर्यादा ओलांडली होती.
वैज्ञानिकांच्या पुराव्यानुसार NO₂ च्या संपर्कात असल्यास अस्थमाचा धोका, श्वासनलिकेत जळजळ, श्वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळे फुफ्फुसांच्या विकारात वाढ होऊन ते निकामी होण्याचा अथवा फुफ्फुसांचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. नाकातून तसेच तोंडातून रक्त येणे, हृदयासंबंधित आजाराला सामोरे जावे लागते.
वायू प्रदूषण केवळ दिल्ली किंवा उत्तर भारतापुरते मर्यादित नाही. तर भारतातील सर्व शहरांमध्ये NO₂ची सर्वाधिक पातळी अहवालानुसार दिसून आली आहे. याचे मुख्य कारण वाढते शहरीकरण आणि वाहनांची वाढती संख्या आणि इंधनाचा वाढता वापर आहे.
जसजशी शहरे वाढतात तसतसे खाजगी वाहनांमध्ये वाढ होते आणि त्यामुळे हवेची गुणवत्ता बिघडते आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते.
बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, मुंबई, कोलकाता आणि पुणे यांसारख्या शहरांमधील वायू प्रदूषणाच्या संकटाचा सामना करण्यासाठी ग्रीनपीस इंडियाने रिजन स्पेसिफिक अप्रोचची शिफारस केली आहे.
वायुप्रदूषण (Air pollution) हा भारतातील नागरिकांच्या आरोग्यासाठी वाढता धोका आहे. ज्यासाठी उपायकारक निर्णय घेणे आवश्यक आहेत. खासगी वाहनांवर आळा घालण्यासाठी उपाय योजना केल्या पाहिजेत.
स्थानिक प्रशासनाने सार्वजनिक वाहतूक सुधारून वाहनांचे उत्सर्जन कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. जसे की महिलांसाठी मोफत प्रवास, कमी किमतीचे सेन्सर आणि उपग्रह डेटा एकत्रित करणारे हायब्रीड वायु गुणवत्ता मॉनिटरिंग नेटवर्क विकसित करण्याच्या दिशेनेही गुंतवणूक केली पाहिजे.
हेही वाचा