माटुंगा पोलिसांनी आंतरराज्यीय बालकांची तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई करत नऊ जणांना अटक केली. या आरोपींमध्ये मुंबई, गुजरात आणि कर्नाटक या भागातून अटक करण्यात आलेल्या आठ महिलांचा समावेश आहे. या गुन्ह्यात कर्नाटकातील एक डॉक्टर आणि नर्सचाही सहभाग असल्याचा संशय आहे.
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, सुटका करण्यात आलेल्या चार महिन्यांच्या मुलीला कर्नाटकातील कारवारमधील एका जोडप्याला 5 लाख रुपयांना विकण्यात आले होते.
सुलोचना सुरेश कांबळे (४५), मीरा राजाराम यादव (४०), योगेश भोईर (३७), रोशनी घोष (३४), संध्या राजपूत (४८), मदिना उर्फ मुन्नी इमाम चव्हाण (४४), तैनाज शाहीन चौहान (19), बेबी मोईनुद्दीन तांबोळी (50) आणि मनीषा सनी यादव (32) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. .
याप्रकरणी विकलेल्या मुलीच्या आजीने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तक्रारदार ही सायन-माहीम लिंक रोड परिसरात राहते आणि 11 डिसेंबर रोजी तिने आपल्या सुनेविरुद्ध आपल्या चार महिन्यांच्या मुलीला बंगळुरूला नेऊन विकल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली.
या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच, मनीषा यादवला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तिने वडोदरा येथे राहणाऱ्या मदिना उर्फ मुन्नी आणि तैनाज यांच्या मदतीने कर्नाटकातील एका जोडप्याला बाळ विकल्याची कबुली दिली, त्यासाठी एक लाख रुपये मिळाल्याची माहिती तिने पोलिसांना दिली.
पथकाने वडोदरा तसेच ठाणे, मुंबई, दिवा कल्याण आणि कर्नाटक येथून एका पुरुषासह आठ महिलांना अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता कळले की, मुलीला कारवार येथील एका जोडप्याला 5 लाख रुपयांना विकण्यात आले होते, त्यातील 1 लाख रुपये मुलीच्या आईला देण्यात आले होते, तर इतर महिलांना प्रत्येकी 10,000 ते 15,000 रुपये मिळाले होते.
मुले विकणाऱ्या टोळीत कारवार येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर आणि परिचारिका सहभागी असल्याची माहिती अटक आरोपींना मिळाली होती. कारवार येथून विकलेल्या 4 महिन्यांच्या मुलीची पोलिसांनी सुटका केली.
या टोळीने आतापर्यंत पाच ते सहा मुलांची विक्री केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अटक आरोपींना भोईवाडा न्यायालयात हजर केले असता त्यांना 19 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याप्रकरणी पुढील तपास सुरू असून लवकरच डॉक्टर आणि नर्ससह आणखी काही जणांना अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा