बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने रस्ते आणि पदपथांवर फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावर पालिकेने तोडगा काढला आहे. यासाठी दिल्लीच्या पालिका बाजारापासून प्रेरणा घेऊन मुंबईत भूमिगत मार्केट बनवण्याचा प्रस्ताव दिला ठेवण्यात आला आहे.
अंधेरी पश्चिम येथील गणपतराव आंब्रे उद्यानाखाली भूमिगत मार्केट उभारण्याचा सध्या विचार आहे. मार्केट तयार झाल्यावर उद्यानाची पुन्हा बांधणी केली जाईल. या प्रस्तावात दोन-स्तरीय भूमिगत हॉकिंग प्लाझाचा पार्किंग सुविधांसह समावेश आहे. अंधेरी स्टेशन परिसरातून सुमारे 500 फेरीवाल्यांना स्थलांतरित करण्याच विचार आहे.
पालिकेच्या प्रस्तावाला स्थानिक आमदार अमित साटम यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांच्यानुसार, अंधेरी स्थानकाजवळील फेरीवाल्यांच्या सध्याच्या ठिकाणांच्या तुलनेत प्रस्तावित जागेत पुरेशी गर्दी निर्माण होणार नाही. त्यांनी सध्याच्या अंधेरी मार्केटच्या खाली एक पर्यायी जागा सुचवली आहे. ही जागा स्टेशन आणि SV रोडच्या जवळ आहे. हा एक अधिक व्यावहारिक पर्याय आहे ज्यामुळे फेरीवाल्यांच्या व्यवसायांना अधिक फायदा होईल.
अंधेरी प्रकल्पाव्यतिरिक्त, BMC ने त्याच्या 24 प्रशासकीय वॉर्डातील अधिकाऱ्यांना तत्सम भूमिगत बाजारांसाठी उद्याने किंवा खेळाचे मैदान यासारख्या इतर खुल्या जागा शोधण्याचे निर्देश दिले आहेत.
हेही वाचा
मेट्रो लाईन 2B कॉरिडॉरच्या कामाला विलंब