विनोद कांबळी रुग्णालयात दाखल, प्रकृती गंभीर



विनोद कांबळी यांची प्रकृती बिघडली असून त्यांना ठाणे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. विनोद कांबळी यांना ठाण्यातील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले.

माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची प्रकृती शनिवारी रात्री खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. गेल्या काही वर्षात त्यांची प्रकृति अधिक खालावली. त्यांना आरोग्याशी निगडीत गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. 

अलिकडेच ते शिवाजी पार्क इथे झालेल्या कार्यक्रमात हजर राहिले होते. रमाकांत आचरेकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी सचिन तेंडुलकर देखील हजर होते. 

कांबळीला ठाण्यातील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कांबळी यांच्या समस्या आणि स्थितीबाबत अद्याप सविस्तर माहिती मिळालेली नाही.




Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *