सायन बॅरियर ब्रिजचे बांधकाम सुरू, बस मार्गात बदल



मुंबईतील (mumbai) सायन बॅरियर ब्रिजचे (bridge) बांधकाम सुरू झाले आहे. यामुळे मुंबईकरांना प्रवास करताना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे. सायन बॅरियर ब्रिजचे काम पुढील दोन वर्षे चालेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या अनेक बस इतर मार्गांवर वळवण्यात (diversion) येणार आहे.

A25, 176, 305, 312, A341 आणि 463 या क्रमांकाच्या बसेसचे मार्ग वळवण्यात आले आहेत. सायनकडे (sion) जाणाऱ्या बसेस अशोक मिल नाका येथे डावीकडे वळण घेऊन संत रोहिदास मार्गाने पुढे जातील. तसेच पीला बंगला सिग्नल (वाय जंक्शन) येथून उजवीकडे वळतील.

तसेच या बसेसचे (buses)  नियमित मार्ग पुन्हा सुरू करण्यापूर्वी धारावी डेपो आणि नाईक नगर मार्ग सुरू करण्यात येणार आहेत.

सायनहून सुटणाऱ्या बसेस नाईक नगर येथून उजवीकडे वळण घेतील आणि संत चन्नया मार्गाने पुढे जातील. तसेच पीला बंगला सिग्नल येथून डावीकडे वळतील आणि संत रोहिदास मार्गाने पुढे जातील. तसेच पुढे या बसेस अशोक मिल नाक्यावरून उजवीकडे वळतील.

याशिवाय, मार्ग क्रमांक 11 आणि 374 वरील बसेस देखील सायन बॅरियर ब्रिजवर वळवल्या जातील आणि यू-टर्न घेऊन धारावी (dharavi) डेपो आणि पीला बंगलामार्गे त्यांच्या नियमित मार्गावर वळवण्यात येतील.

तसेच प्रशासनाने हे बांधकाम दोन वर्षे चालेल अशी अपेक्षा असल्याने, प्रवाशांनी त्यांच्या प्रवासाचे वेळेपूर्वी नियोजन करण्याचे आणि बस सेवेतील बदलांबाबत अपडेट राहण्याचे आवाहन केले.


हेही वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *