पालघर आणि रायगडमधील 446 गावे लवकरच विकसित होणार



निती आयोगाच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र सरकारने मुंबई (mumbai) महानगर प्रदेश (mmr) जागतिक हब म्हणून विकसित करण्याच्या योजनेवर काम सुरू केले आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) ला विशेष नियोजन प्राधिकरण (SPA) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

एमएमआर 6,355 चौरस किलोमीटरवर पसरलेला आहे. परंतु सुरुवातीला केवळ 1,250 चौरस किलोमीटर विकसित (development) करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येईल.

पालघर (palghar) आणि रायगड (raigad) जिल्ह्यातील 446 गावांचा ताबा एमएमआरडीएकडे असेल. या क्षेत्रांचा आतापर्यंत मर्यादित विकास झाला आहे. तसेच त्यांचा सर्वांगीण विकास करण्याची योजना आहे.

विकासासाठी निवडलेल्या 446 गावांपैकी 223 गावे पालघर जिल्ह्यातील वसई आणि पालघर या तालुक्यांमध्ये आहेत. उर्वरित गावे रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, पनवेल, खालापूर या तालुक्यांमध्ये आहेत.

एमएमआरडीएच्या (mmrda) हद्दीत आता पाताळगंगा नदीचा दक्षिणेकडील भाग समाविष्ट आहे. तसेच ही हद्द रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यापर्यंत विस्तारलेली आहे. खालापूर, पेण आणि अलिबागमधील गावेही एमएमआर क्षेत्रात समाविष्ट झालेली आहेत.

एमएमआरडीए या क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी काम करेल. विकासामध्ये मेट्रो लिंक, चांगले रस्ते, पूल, नवीन ड्रेनेज यंत्रणा आणि सीवर सिस्टम यांचा समावेश असेल.

ही योजना प्रमुख क्षेत्रांना एमएमआर (mmr) एक जागतिक वित्तीय केंद्र म्हणून विकसित करेल. यामध्ये फिनटेक, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, आरोग्य, शिक्षण, जागतिक विमान सेवा आणि मनोरंजन यांचा समावेश आहे. राज्य सरकार आर्थिक वर्ष 2029-2030 पर्यंत क्षेत्रासाठी USD 300 अब्ज  जीडीपीचे लक्ष्य ठेवत आहे.

केंद्र सरकारचा थिंक टँक असलेल्या निती आयोगानेही हे आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. ही योजना एमएमआरमध्ये आणि त्याच्या आजूबाजूला आधीच सुरू असलेल्या इतर मोठ्या प्रकल्पांसोबत चालविली जाईल.

यापैकी काही प्रकल्पांमध्ये विरार-अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉर, वाढवण बंदर, पालघर बुलेट ट्रेन स्टेशन आणि पनवेल-कर्जत मार्गावरील नवीन उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर यांचा समावेश आहे.


हेही वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *