मुंबई (mumbai) लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी मानली जाते. मुंबईकरांचा लोकल प्रवास सुरळीत आणि सोपा व्हावा यासाठी मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे सतत प्रयत्नशील असते. अनेकदा प्रवाशांना (passengers) गर्दीच्या वेळी लोकल ट्रेनमध्ये चढताही येत नाही. फर्स्ट क्लास असो वा सेकंड क्लास डब्बा, लोकल ट्रेनमध्ये चढणे हे एक जिकरीचे काम झाले आहे. ज्यामुळे प्रवाशांकडून अधिक फेऱ्यांची मागणी होते. मध्य रेल्वेने (central railway) 5 ऑक्टोबरपासून वेळापत्रकात काही बदल केले आहेत.
गर्दीच्या वेळी मुंब्रा आणि कळवा येथे जलद लोकल थांबवा
आता जलद लोकल कळवा (kalwa) आणि मुंब्रा (mumbra) येथे थांबतील. सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी काही लोकल गाड्यांना थांबा मिळेल. नवीन वेळापत्रकानुसार, 5 ऑक्टोबर 2024 पासून हा निर्णय लागू करण्यात येणार आहे. कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकांवरून नियमितपणे मुंबईला पोहोचणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
कोणत्या जलद लोकल गाड्या थांबतील?
अंबरनाथहून मुंबईकडे जाणारी लोकल कळवा रेल्वे स्थानकावर सकाळी 8.56 वाजता थांबेल.
आसनगावहून मुंबईकडे जाणारी लोकल मुंब्रा स्थानकात सकाळी 9.23 वाजता थांबेल.
मुंबईहून बदलापूरकडे जाणारी लोकल कळवा स्थानकावर सायंकाळी 7.29 वाजता थांबेल.
मुंबईहून टिटवाळ्याला जाणारी लोकल मुंब्रा स्थानकावर संध्याकाळी 7.47 वाजता थांबेल.
मध्य रेल्वे 5 ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू करणार आहे. तसेच 5 ऑक्टोबरपासून मध्य रेल्वे नवीन वेळापत्रक सादर करणार आहे. ज्यामध्ये दादर स्थानकातून 10 अप आणि 10 डाऊन लोकल गाड्या सुरु होणार आहेत. यामुळे गर्दी कमी होऊ शकते.
शिवाय, सीएसएमटीहून सुटणाऱ्या 22 फास्ट अप आणि डाऊन गाड्या आता दादरहून सुटतील. या बदलामुळे सीएसएमटी आणि भायखळा स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ शकते.
हेही वाचा