मीरा भाईंदर महानगरपालिका ‘कामयाबी केंद्र’ सुरू करणार

[ad_1]

मीरा भाईंदर (bhayandar) महानगरपालिका (mbmc) कामयाबी सेंटर (kamyabi centre) सुरू करणार आहे. समाजातील आर्थिकदृष्ट्या वंचित घटकातील महिलांना (womens) मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन नोकरीच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने हे सेंटर सुरू करण्यात येणार आहे. यासाठी मीरा-भाईंदर महानगरपालिकेने Kaam.com शी करार केला आहे. 

महापालिका हद्दीतील महिलांना अनुरूप रोजगाराच्या संधी आणि आवश्यक कौशल्य विकास कार्यक्रम उपलब्ध करून देऊन त्यांना सक्षम करण्याचे मूळ उद्दिष्ट असेल.

“मिरा-भाईंदरमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये लोकसंख्या वाढली आहे. ज्यामध्ये करिअरच्या संधी आणि कौशल्य विकासाची संबंधित काम शोधणाऱ्या महिलांची लक्षणीय संख्या आहे. तथापि, आर्थिक अडचणी, औपचारिक प्रशिक्षण आणि करिअर समुपदेशनासाठी मर्यादित प्रवेश यामुळे मोठ्या संख्येने महिलांना अडथळ्यांचा सामना करावा लागतो. या आव्हानांना तोंड देण्यासाठी आम्ही Kaam.com सोबत करार केला आहे,” असे महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी सांगितले.

नोकरी शोधणारे मूल्यांकन आणि समुपदेशन, मूलभूत रेझ्युमे डेव्हलपमेंट, विविध उद्योगांमध्ये नोकरीच्या संधींसह प्लेसमेंट सेवा, व्यक्तिमत्व विकास आणि इंग्रजी संभाषण कौशल्यांवर व्हिडिओ-आधारित प्रशिक्षण, विशिष्ट नोकरीच्या भूमिकांवर केंद्रित कार्यशाळा आणि साप्ताहिक ग्रूमिंग सत्र इ. सेवा या कामयाबी केंद्रात प्रदान केल्या जाणार आहेत.

कामयाबी सेंटर विविध CSR उपक्रमांतर्गत मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांसोबत काम करणार आहे. ज्याचा उद्देश महिलांना नोकरी-विशिष्ट कौशल्ये, मार्गदर्शन आणि नेटवर्किंगच्या संधी उपलब्ध करून देऊन महिलांना त्यांचे करिअर सुरू करण्यास मदत करणार आहे. तसेच त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणार आहे. अधिक माहितीसाठी 74001 83943 किंवा apply@kaam.com या ईमेलवर संपर्क साधू शकतात.


हेही वाचा

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *