शाळांच्या इमारतीवर मोबाईल टॉवर उभारता येणार नाही : हायकोर्ट

[ad_1]

दक्षिण मुंबईतील एका शाळेच्या छतावरील मोबाईल टॉवरमुळे विद्यार्थी तसेच रहिवाशांच्या जीवाला धोका आहे. तसेच, शाळा, कॉलेजच्या इमारतींवर मोबाईल टॉवर उभारण्यास मनाई असल्याने तत्काळ कारवाईचे निर्देश उच्च न्यायालयाने संबंधित कंपनीला दिले आहेत.

मोबाईल टॉवर्स उभारण्यासंबंधी 2013च्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार शाळा, कॉलेज व रुग्णालये इमारतींच्या टेरेसवर मोबाईल टॉवर उभारण्यास बंदी आहे. असे असताना डोंगरी परिसरातील एका शाळेच्या टेरेसवर एका मोबाईल कंपनीने टॉवर उभारला आहे.

याविरोधात कैसर-ए-अमीन बिल्डिंग टेनंट असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ॲड. विश्वनाथ पाटील, ॲड. अक्षय नायडू आणि ॲड. केदार न्हावकर यांच्यामार्फत दाखल याचिकेवर न्या. अजय गडकरी आणि न्या. कमल खाता यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी पालिकेने मोबाईल टॉवर्स उभारणीसाठीच्या 21 जानेवारी 2013 रोजी सुधारित मार्गदर्शक तत्त्वानुसार घरमालकांची संमती घेणे बंधनकारक आहे.

तसेच, शाळा- कॉलेजच्या इमारतींच्या छतावर टॉवर उभारणीवर बंदी असल्याचा युक्तिवाद रहिवाशांतर्फे करण्यात आला. त्याची दखल घेत खंडपीठाने तत्काळ टॉवर हटवण्याचे निर्देश दिले. तसेच, गरज पडल्यास पोलिसांच्या बंदोबस्तात ही कारवाई करावी, असे निर्देशही दिले आहेत.


हेही वाचा

मीरा-भाईंदर : चौथ्या मजल्यांवरील घरांना नवीन पाणी कनेक्शन मिळणार नाही


गोरेगाव : नेस्कोला भटक्या कुत्र्यांसाठी फीडिंग झोन तयार करण्याचे आदेश

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *