मुंबई पोलिसांकडून महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचा आढावा

[ad_1]

माजी मंत्री बाबा सिद्दीकींच्या (baba siddique) हत्येनंतर मुंबई (mumbai) पोलिसांच्या (mumbai police) संरक्षण आणि सुरक्षा विभागाने विशेष बैठक आयोजित केली होती. या बैठकीत अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचा (police securtiy) आढावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

तसेच पोलीस सुरक्षा रक्षकांनी (security guard) महत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेत येणाऱ्या अडचणींची माहिती दिली. अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

मंगळवारी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात नवीन परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. अनेक वेळा महत्त्वाच्या व्यक्ती सुरक्षा रक्षकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. यामुळे त्यांच्या स्वतःच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो.

सुरक्षा रक्षकाने अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीसोबत रहावे. कधी कधी अतिमहत्त्वाचे लोक दुसऱ्या वाहनातून सुरक्षा रक्षकांसह प्रवास करतात. तसेच ते अचानक कुठेतरी जायचं ठरवतात. सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या सूचना ऐकल्या नाहीत तर त्यांची तक्रार करून बदली करण्याची मागणी केली जाते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

बाबा सिद्दिकी प्रकरणानंतर सुरक्षा रक्षकांना कोणत्याही परिस्थितीत नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

बाबा सिद्दीकींच्या सुरक्षेत काही चूक झाली का? याचीही चौकशी करण्यात येत आहे. तसेच त्याच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर, तसेच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. महत्त्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकांना योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


हेही वाचा

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *