मुंबई : कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, चालकावर गुन्हा दाखल

[ad_1]

मुंबईत (mumbai) अपघाताच्या घटनांमध्ये लक्षणीयरित्या वाढत आहेत. अशातच मुंबईत आणखीन एका अपघाताची (accident) दुर्दैवी घटना घडली आहे. अंधेरीतील (andheri) लोखंडवाला (lokhandwala) परिसरात एका 29 वर्षीय तरुणाचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू झाला आहे.

ओशिवरा येथील लोट्स पेट्रोल पंपावर हा अपघात झाला. उमाशंकर रोहिणी प्रसाद शुक्ला असे मृत तरुणाचे नाव आहे. तो डिलिव्हरी एजंट म्हणून काम करायचा. तो मूळचा मध्य प्रदेशचा (madhya pradesh) रहिवासी आहे.

मंगळवारी लोटस पेट्रोल पंपाजवळ शुक्ला यांच्या दुचाकीला कारने धडक दिली. त्यामुळे शुक्ला खाली पडले आणि त्याचे डोके कारच्या मागील चाकाखाली आले. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला.

धडक दिल्यानंतर कार चालकाने काही अंतरावर वाहन थांबवले. तसेच कारचालकाने परत मागे येऊन जखमी शुक्ला यांना रिक्षात बसवून कूपर रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी शुक्ला यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी कार चालक सौरभ सोलंकी (42) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


हेही वाचा

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *