मुंबईसह महाराष्ट्रात हाय अलर्ट

[ad_1]

भारत पाकिस्तान मधील तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाकिस्ताननं जम्मू काश्मीर, राजस्थान, पंजाब राज्यातील विविध भागात ड्रोन, मिसाईल आणि लढाऊ विमानाद्वारे हल्ले करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीम S-400 नं पाकिस्तानच्या ड्रोन मिसाईल आणि लढाऊ विमान पाडण्यात यश मिळवलं आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव लक्षात घेता.

राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, पोलिस अधिक्षक, विशेष पोलीस महानिरीक्षक, उप महानिरीक्षकांना पोलीस महासंचालक कार्यालयाकडून सूचना देण्यात आल्या आहेत.

आपल्या हद्दीतील धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे, रेल्वे स्थानके, गर्दीची ठिकाणे, सागरी हद्द या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थाच्या दृष्टीने आवश्यकत्या उपाय योजना करणे, कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.

ऑपरेशन सिंदूर नंतर दहशतवादी कडून देशातील महत्वाच्या स्थळांना दहशतवादी कडून लक्ष करण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी सतर्क राहण्याचे आदेश दिले गेले आहेत.


[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *