बेस्ट बसच्या तिकीटदरात वाढ

[ad_1]

बेस्ट उपक्रमाला होणारा आर्थिक तोटा पाहता भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय उपक्रमाने घेतला होता. त्याची अंमलबजावणी शुक्रवार, 9 मे पासून करण्यात येत असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली.

पाच किमीपर्यंतच्या विना वातानुकूलित बस प्रवासासाठी पाच रुपयांऐवजी 10 रुपये तर वातानुकूलित प्रवासासाठी सहा रुपयांऐवजी 12 रुपये मोजावे लागणार आहेत. बदलांनुसार, पाच ते 12 वयापर्यंतच्या मुलांना हाफ तिकीट लागू होत आहे.

बेस्ट (best) उपक्रमाने दैनंदिन आणि मासिक बसपासच्या दरातही वाढ (fare hike) करण्याचा निर्णय घेतला आहे. दैनंदिन बसपासचे शुल्क 60 रुपयांवरून 75 रुपये करण्यात आले आहे. मासिक शुल्क 900 रुपयांवरून एक हजार 800 रुपये केल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली.

मुंबई (mumbai) महापालिकेच्या (bmc) हद्दीबाहेर पथकर नाक्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून विना वातानुकूलित आणि वातानुकूलित बससेवांवर दोन रुपये अतिरिक्त प्रवास भाडे आकरण्यात येणार आहे.

इलेक्ट्रॉनिक पद्धतीने व्यवहार करणाऱ्या प्रवाशांना प्रस्तावित बसमधील 60, 90 आणि 120 बस फेऱ्यांसाठीच्या बसपासवर पाच टक्के अतिरिक्त फेऱ्या देण्यात येतील. वॉलेट स्वरूपात शुल्क भरणा केल्यास, पाच टक्के इतका अतिरिक्त भरणा दिला जाईल.

विद्यमान भाडे टप्पा हा 5, 10, 15 आणि 20 किमी अंतराचा आहे. मात्र नवीन भाडेटप्पा हा 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45 आणि 50 किमी व त्यानंतर प्रत्येक पाच किमी अंतरावर अशा पद्धतीने असेल.

विना वातानुकूलित नवीन प्रवासभाडे
(सवलतीचे भाडे कंसात)

5 किमी 10 रु. (5 रु.)
10 किमी 15 रु. (8 रु.)
15 किमी 20 रु. (10 रु.)
20 किमी 30 रु. (15 रु.)
25 किमी 35 रु. (15 रु.)
30 किमी 40 रु. (20 रु.)
50 किमी 60 रु. (30 रु.)

वातानुकूलित नवीन प्रवासभाडे
(सवलतीचे भाडे कंसात)

5 किमी 12 रु. (6 रु.)
10 किमी 20 रु. (12 रु.)
15 किमी 30 रु. (15 रु.)
20 किमी 35 रु. (15 रु.)
25 किमी 40 रु. (20 रु.)
30 किमी 45 रु. (20 रु.)
50 किमी 65 रु. (30 रु.)


हेही वाचा

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *