मुंबईत गेल्या सहा वर्षांत चाळीस मराठी शाळा बंद

[ad_1]

मुंबईत (mumbai) गेल्या सहा वर्षांमध्येच मराठी माध्यमाच्या 40 शाळांना टाळे लागल्याची आकडेवारी समोर आली आहे. या 40 शाळांमधून तब्बल 50 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी (students) मराठीऐवजी इतर माध्यमांच्या आणि इतर बोर्डाच्या शाळेत प्रवेश घेतला आहे. विशेष म्हणजे, दक्षिण मुंबईतील (south mumbai) सर्वाधिक 20 मराठी शाळा गेल्या सहा वर्षांत बंद पडल्या आहेत.

मुंबईतील मराठीबहुल वस्तीचा भाग अशी ओळख असलेल्या दादरमधील नावर गुरुजी विद्यालय ही जुनी शाळा बंद पडण्याच्या वाटेवर असतानाच मुंबई शहर व जिल्ह्यातील मराठी शाळांच्या दयनीय स्थितीची आकडेवारी समोर आली आहे.

2019-20 या वर्षात संपूर्ण मुंबईत मराठी माध्यमाच्या 461शाळा होत्या. ही संख्या 2024-25 मध्ये 421 एवढीच राहिली आहे. मराठी माध्यमात प्रवेश घेणाऱ्या विद्याथ्यांची संख्या सहा वर्षांपूर्वी 1.35 लाखांच्या आसपास होती. त्यात घसरण होऊन ती 85 हजारांपर्यंत घटली आहे.

महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानवसार मुंबईतील मराठी शाळांच्या (marathi schools) या स्थितीला सरकार जबाबदार असल्याचा ठपका मराठी अभ्यास केंद्राच्या सुशील शेजुळे यांनी मांडला. मराठी शाळा बंद पडत असल्याची आकडेवारी गेल्या काही वर्षांपासून अशीच आहे.

तरीही एवढ्या वर्षांमध्ये सरकारला, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना, मराठीच्या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्यांना त्यासाठी काहीच करावेसे वाटले नाही. अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. मराठी शाळा जपण्यासाठी सरकारने आत्ताच ठोस उपाययोजना करायला हवी,’ असे ते म्हणाले.

मराठी शाळांमधील पायाभूत सुविधांचा दर्जा, हे देखील मराठी शाळांकडे पालकांच्या घटत्या ओढ्याचे प्रमुख कारण असल्याचे मानले जाते. इंग्रजी माध्यमाच्या किंवा इतर बोर्डांच्या शाळांमध्ये भले अप्रशिक्षित शिक्षक असतील, तरी तेथील पायाभूत सुविधा, हवेशीर वर्गखोल्या, मोठाल्या प्रयोगशाळा आदींमुळे पालकांनाही या शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळते, असे वाटते.

त्यामुळे मराठी शाळांमधील पायाभूत सुविधांचा विकास करण्याकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा मराठी शाळांसाठी काम करणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

मराठी शाळांची आकडेवारी:

वर्ष शाळांची संख्या विद्यार्थी संख्या
2019-20 461 1,32,267
2020-21 448 1,12,595
2021-22 438 1,05,524
2022-23 426 98,264
2023-24 423 90,938
2024-25 421 85,469

हेही वाचा

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *