मुंबईतील महालक्ष्मी मंदिराच्या विकासासाठी ‘इतका’ निधी मंजूर

[ad_1]

महालक्ष्मी मंदिर परिसर विकासासाठी मुंबई (mumbai) महापालिकेने एका कंत्राटदाराचीही निवड केली होती. मात्र या प्रकल्पासाठी लागणारा निधी प्राप्त झाला नव्हता. अखेर प्रकल्पासाठी 37 कोटी 32 लाख रुपये खर्च मंजूर करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

उज्जैनमधील महाकाल मंदिराच्या धर्तीवर मुंबईतील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर परिसराचा विकास होणार आहे. यानुसार, मंदिराकडे जाणाऱ्या मार्गाची सुधारणा, मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील दुकानाची फेररचना, गर्दीचे नियोजन आदी कामे केली जाणार आहेत.

ही विकासकामे दीड वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. महालक्ष्मी मंदिर हे महाराष्ट्रासह (maharashtra) देशभरातील प्रमुख आणि प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक आहे. मंदिरात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. मात्र दर्शनासाठी येताना दाटीवाटीचे रस्ते, वाहनांची गर्दी, अरुंद रस्ते, त्यातच अनधिकृत पार्किंग इत्यादींचा सामना करावा लागतो.

भाविकांना सुलभरीत्या दर्शन व्हावे, या हेतूने मुंबई महापालिकेने (bmc) राज्य सरकारच्या मदतीने मंदिर परिसरांचा विकास करण्याचा विशेष प्रकल्प हाती घेतला आहे. मंदिर परिसर महापालिकेच्या डी वॉर्डच्या अखत्यारित येत असल्याने त्याचा विकास करण्याचे काम महापालिकेकडून केले जाणार आहे.

महालक्ष्मी मंदिर (mahalaxmi temple) परिसर विकासासाठी 25 कोटी रुपयांपर्यंत खर्च येईल, असा अंदाज होता. मात्र या कामासाठी नेमलेल्या सल्लागाराने 37 कोटी 32 लाख 10 हजार रुपये खर्च असल्याचा अहवाल तयार केला.

हा प्रस्ताव मुंबई महापालिका आयुक्त यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आणि या खर्च प्रस्तावाला मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी मंजुरी दिली. मंदिर परिसरांचा विकास (renovation) करण्यासाठी राज्य सरकारने याआधीच त्यांच्या भागीदारीतील निधीही मंजूर केला आहे. त्यामुळे या कामाला गती मिळेल, अशी माहिती देण्यात आली.

महालक्ष्मी मंदिरातील विकासकामे पुढीलप्रमाणे:

  • मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील दुकानांची फेररचना करून सुसूत्रीकरण
  • मंदिराकडे जाणाऱ्या मार्गाची सुधारणा
  • भिंतींची कलात्मक रंगरगोटी
  • हेरिटेजशैलीत पथदिव्यांचे खांब, लाकडी बाकड्यांची उभारणी साइन बोर्ड बसविणे
  • मुख्य मार्गावर कमानी बसविणे
  • गर्दीच्या नियोजनासाठी उपाययोजना
  • कोस्टल रोडच्या बाजूला असलेल्या उद्यानामधून आकाशमार्गिका किंवा जिना वा सरकता जिन्याची उभारणी
  • परिसरात पार्किंग तसेच, विद्युत वाहनांची व्यवस्था
  • मोकळ्या जागेवर झाडांची लागवड मंदिर
  • परिसरात शेड बसवणे, सोलर पॅनल बसवणे
  • मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई
  • भिंतीवर आवश्यकतेनुसार भित्तीशिल्प, दीपस्तंभ बसविणे

हेही वाचा

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *