भ्रष्टाचाराचे आरोप असलेले 96 पालिका अधिकारी पुन्हा नोकरीवर



भ्रष्टाचाराचे आणि फौजदारी स्वरुपाचे आरोप असलेल्या 96 पालिका अधिकाऱ्यांना मुंबई (mumbai) महापालिकेने (bmc) पुन्हा सेवेत घेतले आहे. या आधी लोकसभा निवडणूकीच्या काही आठवडे आधी, निलंबन पुनरावलोकन समितीच्या निर्णयानंतर या अधिकाऱ्यांना सेवेत घेण्यात आले होते. 

मुंबई (mumbai) महानगरपालिकेने निलंबित केलेले तब्बल 96 अधिकारी, अभियंते यांना पुन्हा एकदा कामावर घेतले आहे. त्यातील 19 जणांवर गुन्हेगारी स्वरुपाचे आरोप आहेत तर 77 जणांवर भ्रष्टाचाराचे (corrupt) आरोप आहेत. या अधिकाऱ्यांना (employees)निलंबन पुनरावलोकन समितीच्या निर्णयानुसार पुन्हा नियुक्त करण्यात आले आहे. 

भ्रष्टाचाराची सर्वाधिक प्रकरणे नगर अभियंता विभागातील असून तेथील 28 अभियंते पुन्हा सेवेत आले आहेत. गुन्हेगारी प्रकरणांमध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागात सर्वाधिक आरोपी अधिकारी आहेत. 

यावेळेस मुंबई महानगरपालिका प्रशासन सार्वजनिक हितासाठी काम करते की भ्रष्ट लोकांच्या हितासाठी काम करते असा प्रश्न जितेंद्र घाडगे यांनी उपस्थित केला आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अधिकाऱ्यांविरुद्ध कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.

निवडणुकीच्या काही काळ आधी या अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत घेणे संशयास्पद आहे. विशेषत: हे अधिकारी निवडणूक कर्तव्यातही सहभागी होते असाही आरोप जितेंद्र घाडगे यांनी केला आहे.


हेही वाचा

आमदार सुनील प्रभू यांची महापालिका आयुक्तांकडे तक्रार

मुंबई-पुणे अंतर कमी होणार



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *