Job Interview : नोकरीसाठीच्या (Job News) मुलाखतीला गेल्यावर आपण समोरच्या व्यक्तीपुढं, संस्थेपुढं स्वत:ला कसं सादर करतो याबाबत अनेकांनाच दडपण येतं. कितीही मुलाखती दिल्या, नोकऱ्या बदलल्या तरीही प्रत्येकवेळी नवे अनुभव यायचे ते येतातच. नोकरीच्या मुलाखतीमध्ये बऱ्याचदा लहानशी चूक संधी गमावण्याचं कारण ठरु शकते. पण, सध्या सोशल मीडियावर एका अशा महिलेची चर्चा सुरु आहे, जिनं नोकरीच्या मुलाखतीदरम्यान एका चुकीमुळं तिला चक्क दुप्पट पगाराची ऑफर देण्यात आली.
तुम्हालाही आश्चर्य वाटतंय ना? रेडिटवर या महिलेनं आपला अनुभव सांगितला. कशा पद्धतीनं मुलाखतीत आपण दुप्पट पगार मागितला, या प्रसंगाविषयी सांगताना काही गोष्टी प्रकाशात आणल्या. कर्मचारी नियुक्तीच्या प्रक्रियेदरम्यान संस्थेकडून नोकरीविषयीच्या सविस्तर माहितीमध्ये महत्त्वाच्या गोष्टींची नोंद नसल्याचं या महिलेनं सांगितलं.
Mirror च्या वृत्तानुसार न्यूयॉर्कच्या या महिलेला मार्केटिंग क्षेत्रात जवळपास दशकभराच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. आपण कोणत्या क्षेत्रात उत्तम काम करु शकतो याचीही तिला कल्पना असून, तिनं आतापर्यंत कैक वर्षे अतिशय आव्हानात्मक परिस्थितीमध्येही नोकरी केली आहे. पण, आता मात्र कुठंतरी स्थैर्य मिळायलाच हवं या हेतूनं तिनं नव्या नोकरीचा शोध सुरू केला जिथं तणाव तुलनेनं कमी असण्यावर ती भर देताना दिसली.
महिलेनं एक अशी जाहिरात पाहिली, जिथं तिला मनाजोग्या नोकरीचे संकेत मिळाले. मुलाखतीदरम्यान आपल्या नोकरीमध्ये आंततराष्ट्रीय दौरेही समाविष्ट असल्याची बाब तिच्या लक्षात आली आणि इथंच तिनं एक चूक लक्षात आली. आपण 8 तास दर दिवशी काम करणार आणि ज्या वेळेत प्रवास करणार तेव्हाचे तास पाहिले तर कामासाठी खर्ची घातलेला वेळ दुप्पट होत आहे. परिणामी, कंपनीकडून मिळणारं वेतन समाधानकारक नाही, त्यामुळं मला दुप्पट पगार हवा आहे अशी मागणी तिनं केली.
कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये असं काही नसतं, असं उत्तर दिला मुलाखतकारानं दिलं. पण, तुम्ही नोकरीविषयीच्या माहितीमध्येच फसवणूक केली आहे ही बाब उजेडात आणली. आपल्या या स्पष्टवक्तेपणामुळं नोकरी गमावावी लागणार असंच या महिलेला वाटत होतं, पण तिचा हाच अंदाज संस्थेला भावला आणि दुप्पट पगार देत त्या कंपनीनं महिलेला नोकरी देत हे तुमच्या वाट्याचं यश आहे असंही म्हटलं. हा प्रसंग काहीसा ‘3 इडियट्स’ चित्रपटातील दृश्याच्या जवळ जाणारा वाटत असला तरीही तो काल्पनिक नाही हेसुद्धा तितकंच खरं.