[ad_1]
- Marathi News
- International
- Kamala, Trump…anyone Wins, Possibility Of 150 Indians In Senior Posts Including 5 Ministers, Shadow Cabinet Of Both Candidates Will Be Dominated By Indians
मोहंमद अली4 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

अमेरिकेतील निवडणुकीबाबत स्थलांतरित भारतीय उत्साहीत आहेत. कारण, डेमोक्रॅटिक उमेदवार कमला हॅरिस जिंकल्यास त्या अमेरिकेतील पहिल्या भारतीय वंशाच्या राष्ट्राध्यक्ष होतील. दुसरीकडे, माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे भारतीय समर्थकही उत्साहित आहेत.,त्यांच्या म्हणण्यानुसार, ट्रम्प प्रशासनात भारतीयांचे प्रतिनिधित्व सर्वाधिक असेल.
ट्रम्प यांच्या मागील कार्याकाळात ८० हून जास्त भारतीय वंशाच्या अमेरिकींना वरिष्ठ पदांवर नियुक्त केले होते. त्यांच्या प्रचार व्यवस्थापकाने सांगितले की, राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प यांच्या कार्यकाळात ही संख्या १५० हून जास्त होऊ शकते. कमला व ट्रम्प यांच्या प्रचार टीमनुसार, राष्ट्राध्यक्ष पदाच्या दोन्ही उमेदवारांनी शॅडाे कॅबिनेटची रूपरेषा तयार केली अाहे. ज्यात भारतीय वंशाच्या अमेरिकींचा दबदबा राहण्याची अपेक्षा अाहे. कमला हॅरिस यांच्या शॅडाे कॅबिनेटमध्ये ५ तर ट्रम्प यांच्या कॅबिनेटमध्येही ४ ते ५ भारतीय वंशजांचा समावेश होऊ शकताे.
माजी राष्ट्राध्यक्ष ओबामांनी ६०, बायडेन प्रशासनाने १३० पदांवर केले भारतवंशी नियुक्त
माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ८ वर्षांच्या कार्यकाळात भारतीय वंशाच्या ६० हून अधिक भारतीयांना वरिष्ठ पदांवर नियुक्त केले होते. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भारतीय वंशाच्या १३० भारतीयांना वरिष्ठ पदांवर नियुक्त केले होते. निवडणुकांच्या निकालानंतर, ट्रम्प किंवा कमला हॅरिस विजयी असोत, १५० हून अधिक भारतीय-अमेरिकनांना वरिष्ठ पदांवर नियुक्त केले जाण्याची शक्यता आहे.
नीरा टंडन अन् विवेक मूर्ती कायम राहतील
यादीत सर्वात वरती नीरा टंडन यांचे नाव आहे. त्या व्हाइट हाऊस ऑफिस ऑफ मॅनेजमेंट अँँड बजेटचा संचालक आहेत. माजी सर्जन जनरल डॉ.विवेक मूर्ती कायम राहतील.न्याय विभागात माजी असोसिएट ॲटर्नी जनरल वनिता गुप्ता, नागरिक सुरक्षेतील माजी अवर सचिव उजरा जेया, आशियाई अमेरिकींवरील राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार आयोगाचे माजी सदस्य अजय जैन भूतोरिया तसेच सुमानो गुहा यांची नियुक्ती होईल.
कमला प्रशासन : डॉ. बेरा, रो खन्ना, कृष्णमूर्ती, ठाणेदार स्पर्धेत
हॅरिस प्रशासनाने ज्या भारतीय वंशाच्या नेत्यांना मंत्रिमंडळात जागा मिळण्याची शक्यता अाहे, त्यात अमेरिकी काँग्रेसचे ५ नेत सर्वात पुढे आहेत. अमेेरिकी काँग्रेसचे सदस्य डॉ. अमी बेरा, रो खन्ना, राजा कृष्णमूर्ती, श्री ठाणेदार आणि प्रमिला जयपाल यांची नावे आघाडीवर आहेत. सूत्रांनुसार, महिलांची संख्या बायडेन-कमला हॅरिस प्रशासनात वरिष्ठ भूमिकांसाठी नियुक्त केलेल्या निम्म्याहून अधिक भारतीय अमेरिकी आणि ओबामा प्रशासनाद्वारे नियुक्त केलेल्या काही लोकांना कायम ठेवण्याची अपेक्षा आहे.
राज शाह, अजित पै अन् नेओमींना पद
ट्रम्प यांचे माजी मुख्य उप प्रेस सचिव राज शाह, युनायटेड स्टेट्स फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनचे अध्यक्ष अजित पै आणि व्हाइट हाऊसमधील माहिती आणि नियामक व्यवहार कार्यालयाच्या प्रशासक निओमी राव यांचा समावेश आहे. सीमा वर्मा, सेंटर्स फॉर मेडिकेअर अँड मेडिकेड सर्व्हिसेसच्या माजी प्रशासक, फेडरल एनर्जी रेग्युलेटरी कमिशनचे माजी अध्यक्ष नील चॅटर्जी तसेच मनीषा सिंग विशाल अमीन यांचाही समावेश आहे.
ट्रम्प प्रशासन: विवेक रामास्वामी, निक्की यांचे मंत्रिपद निश्चित
ट्रम्प कॅबिनेटमध्ये विवेक रामास्वामी आणि निक्की हेली यांची नावे सर्वात पुढे आहेत. दोन्ही उमेदवार रिपब्लिकन उमेदवाराच्या तिकिटाच्या रेसमध्ये सहभागी होते आणि नंतर ट्रम्प यांना पाठिंबा देऊन त्यांनी माघार घेतली. दोघांना मंत्रिमंडळात जागा मिळू शकेल.अमेरिकी सुरक्षा परिषदेत अधिकारी वकील काश पटेल मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. रिपब्लिकन हिंदू आघाडीचे संस्थापक शलभ कुमार महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यानंी ट्रम्प यांच्यासाठी ३४८५ कोटी दिले आहेत. याशिवाय राज शाह हेही स्पर्धेत आहेत.
[ad_2]
Source link