अबब! 500,000,000,000 ची संपत्ती? अखेर एलॉन मस्कच्या श्रीमंतीचा स्त्रोत जगासमोर; पाहा पाण्यासारखा पैसा येतोय कुठून…


Elon Musk Net Worth : जगभरातील किंबहुना या विश्वातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी ओळख असणाऱ्या एलॉन मस्क याच्या श्रीमंतीचा, त्याच्या एकूण संपत्तीचा आकडा पाहिला की भल्याभल्यांना घाम फुटतो. अर्थार्जनाच्या बाबतीत नवनवीन विक्रमांची नोंद करणाऱ्या या मस्कनं काही दिवसांपूर्वीच एकूण संपत्तीचा नवा विक्रम रचत साऱ्या जगाला थक्क केलं. ज्यानंतर अवघ्या काही दिवसांतच तो स्वत:चाच विक्रम मोडत श्रीमंतीचा एक नवा टप्पा गाठण्यासाठी सज्ज झाला आहे. 

जाणून आश्चर्य वाटेल, किंबहुना विश्वासही बसणार नाही. पण, मस्कची एकूण संपत्ती लवकरच 500 अब्ज डॉलरवर पोहोचणार आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअरच्या माहितीनुसार नव्या आकडेवारीनुसार हा आकडा सध्या 474  अब्ज डॉलरवर पोहोचला असून, एका दिवसात त्याच्या कमाईत तब्बल 19.2 अब्ज डॉलर इतकी भर पडणं ही निव्वळ अविश्वसनीय बाब आहे. 

वर्षभरात श्रीमंती झपाट्यानं वाढली 

साधारण वर्षभराच्या काळात मस्कच्या संपत्तील लक्षणीय वाढ झाल्याचं आढळून आलं. एका वर्षाच्या आतच त्यानं 245 अब्ज डॉलर इतकी मोठी रक्कम कमवली. अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार शेअरमध्ये आलेली उसळी मस्कच्या कमाईचं मुख्य कारण ठरली. संपूर्ण पृथ्वीवरील मानवविश्वात मस्क हा सर्वाधिक श्रीमंती असणारा व्यक्ती असून, त्याच्यामागोमाग जेफ बेजोस यांचं नाव येतं. या यादीत तिसऱ्या स्थानावर मार्क झुकरबर्गचं नाव असून, त्याची एकूण संपत्ती आहे 221 अब्ज डॉलर. मस्कच्या एकूण संपत्तीपासून मात्र या साऱ्यांची संपत्ती फारच कमी आहे ही बाब या यादीत अधोरेखित होत आहे. 

मस्कच्या श्रीमंतीचा मुख्य स्त्रोत काय? 

जागतिक स्तरावर मस्कचं महासत्ता राष्ट्रांच्या राष्ट्राध्यक्षांशी असणारे संबंध आणि त्यांच्याशी असणारं व्यवहार्य नातं याचा सर्वाधिक फायदा थेट त्याच्या श्रीमंतीमध्ये दिसून येतो. याचच एक उदाहरण म्हणजे अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत मस्कनं डोनाल्ड ट्रम्प यांना खुला पाठिंबा दिल्यामुळं निकालानंतर मस्कच्या कंपनीचे शेअर वायुवेगानं पुढे गेले. 5 नोव्हेंबर रोजी मस्कची एकूण संपत्ती 264 अब्ज डॉलर इतकी होती. ज्यानंतर आता अवघ्या 40 दिवसात त्याची संपत्ती 210 अब्ज डॉलरनं वाढली आणि टक्केवारीनुसार ही तब्बल 107.1 % इतकी विक्रमी वाढ ठरली. 

मस्कचा उल्लेख टेस्लाचा मालक म्हणून होत असला तरीही त्याच्याकडे या कंपनीतील 13 टक्के भागिदारी असून, या कंपनीचा शेअर त्याला तगडी कमाई करून देत आहे. या शेअरमध्ये महिन्याभराच्या काळात 36 टक्क्यांची वाढ झाल्यामुळं त्याच्या कमाईत सातत्यानं भर पडत आहे. तर, स्पेस एक्समध्येही त्याची 42 टक्क्यांची भागीदारी असून, प्राथमिक अंदाजांनुसार त्याच्याकडे अक्स कॉर्पची 79 टक्क्यांची भागिदारी आणि मालकी आहे. विविध क्षेत्रांमध्ये करण्यात आलेली गुंतवणूक, जागतिक अर्थसत्तेचा आढावा घेत घेण्यात आलेले निर्णय या साऱ्याचे सकारात्मक परिणाम मस्कला त्याच्या या वाढत्या श्रीमंतीच्या रुपात पाहायला मिळत आहेत. 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *