Viral News : सिरियामध्ये ८ डिसेंबरला सत्तापातट झाले. असद कुटुंबाच्या दहशतीतून सिरिया मुक्त झाला. येथील नागरिक हे स्वातंत्र्य साजरे करत असतांना आता नवे संकट देशापुढे उभे ठाकले आहे. तब्बल दोन दशकं यादवी युद्धात अडकलेल्या या देशातील जनतेपुढे आता महागाईचा भस्मासुर उभा राहिला आहे. सोशल मीडियावर एका इन्फ्लुएंसरने पोस्ट केलेल्या व्हिडिओनुसार, सीरियामध्ये काहीही खरेदी करण्यासाठी रोख रकमेवर अवलंबून राहावे लागते. व्हायरल व्हिडिओनुसार, इथल्या लोकांनी पर्स ठेवणं बंद केलं आहे. महागाई वाढल्याने इथे काही पैशांएवजी नोटांची बंडलं सोबत ठेवावी लागत आहे.