अनेक कर्मचारी कामाचा ताण नीट सहन करू शकत नाहीत आणि अनेकदा विचार न करता चुकीची पावले उचलतात. नुकतीच पुण्यात एका मुलीला आपला जीव गमवावा लागला.अशा घटना आपल्या आजूबाजूला घडतात. कर्मचाऱ्याचा दिवसातील बराच वेळ हा ऑफिसमध्ये जातो. अशावेळी तेथे असलेलं वातावरण हे नक्कीच त्याच्यासाठी महत्त्वाचं असतं.अशावेळी एका व्यक्तीने आपल्या स्टार्टअप कंपनीत सहन केलेलं टॉक्सिक कल्चर सगळ्यांसमोर मांडलं आहे.
कर्मचाऱ्याने सांगितली ‘ती’ गोष्ट
स्टार्टअप कंपनीत टेक्निकल एक्सपर्ट म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यासोबतही असाच काहीसा प्रकार घडला. स्टार्टअप कंपनीच्या टॉक्सिक कल्चरचा अनुभव त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. Reddit वर आपले मत मांडले आहे, कर्मचाऱ्याने असा दावा केला की कंपनीने त्याला कोणतेही योग्य मार्गदर्शन आणि स्पष्ट सूचना न देता दिवसातून किमान 15 तास काम करायला लावले.
Reddit वर लिहिलेल्या तिच्या पोस्टमध्ये, स्टार्ट कंपनीच्या सह-संस्थापकावर इतर कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याने असेही सांगितले की, व्हिडिओ कॉल दरम्यान तो टेक लीडसमोर रडला होता. तो म्हणाला की, कंपनीत जॉईन झाल्यानंतर लवकरच सगळ्या गोष्टी कठीण होऊ लागल्या, त्याने योग्य प्रशिक्षण आणि नोकरीबद्दल स्पष्ट सूचना न देता काम केले.
अत्याचाराला करुन दिली वाट
i cried on google meet in front of tech lead, do not know how to face it now
byu/MoveTraditional2588 indevelopersIndia
कर्मचाऱ्याच्या म्हणण्यानुसार, तीन सह-संस्थापकांपैकी एकाने टेक लीड म्हणून काम केले आणि अनेकदा कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केले. टेक एक्सपर्टने त्याच्या Reddit पोस्टमध्ये लिहिले की, एवढंच नव्हे तर मला त्याने शिविगाळ देखील केली. तो पुढे म्हणाले की, मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी त्यांच्याकडून कौतुकाची अपेक्षा सोडली आहे, आता आम्ही त्यांच्याकडून एवढीच अपेक्षा करतो की त्यांच्याकडून आम्हाला अनादर होऊ नये.
एकदा एक टेक्निकल हेड त्याच्या समस्यांबद्दल त्याच्या वरिष्ठांशी बोलायचे ठरवले. तो बोलताना एवढा भावुक झाला की, त्याला पुन्हा फटकारल गेलं आणि त्यानंतर तो रडू लागला. अशा पद्धतीच्या वातावरणात काम करताना मानसिकदृष्ट्या खच्चीकरण होत असते.