Girls Fight Video:सोशल मीडियावरसध्या ग्रेटर नोएडा येथील एका कॉलेजमधील मारहाणीचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, दोन तरुणी एकमेकींचे केस पकडून मारहाण करत आहेत. ही घटना ग्रेटर नोएडा येथील ग्रेटर नोएडा इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट (GNIM) कॉलेजमधील असल्याचे सांगितले जात आहे. मुलींमधील मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून हे पाहून सर्वजण अचंबित झाले आहेत.