मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील लोकायुक्त पोलिसांना परिवहन विभागाचे माजी कॉन्स्टेबल सौरभ शर्मा यांच्या घरात ‘कुबेरचा खजिना’ सापडेल, अशी अपेक्षा नव्हती. सोने-चांदी किलोत नव्हे तर क्विंटलमध्ये सापडले आहे. आतापर्यंत सुमारे ३०० किलो सोने, चांदी आणि कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तीन दिवसांपासून घरात संपत्तीचा शोध सुरू असून पथक जिथे हात ठेवेल तिथून सोने, चांदी आणि रोख रक्कम बाहेर येत आहे. सौरभ शर्मा यांच्या कार्यालयातील टाइल्सच्या खालून चांदीचा साठाही बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.