अमेरिकेत आयटी कन्सल्टन्सी सर्व्हिस चालवणाऱ्या भारतीय वंशाच्या एका व्यक्तीला लग्न आणि घटस्फोटासाठी मोठी किंमत मोजावी लागली. नोव्हेंबर २०२० मध्ये पहिल्या पत्नीला पोटगी म्हणून ५०० कोटी रुपये दिल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने दुसऱ्या पत्नीला १२ कोटी रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. त्यांचे दुसरे लग्न काही महिनेच टिकले.