Sunita Williams News : भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स सध्या अंतराळात अडकून पडली आहे. यापूर्वी फेब्रुवारी २०२५ मध्ये सुनिता परत येणे अपेक्षित होते. पण आता नासाने सुनीताच्या परतीला आणखी उशीर होऊ शकतो, असे म्हटले आहे. अंतराळात अडकून पडलेल्या सुनीता विल्यम्स अंतराळात विविध प्रयोग करत आहेत. त्या सुर्योदय आणि सूर्यास्त किती वेळा पाहतात हे तुम्हाला माहित आहे का? तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की सुनीता विल्यम्स एकाच दिवसात चक्क १६ वेळा सूर्योदय आणि सूर्यास्त पाहतात. अंतराळात दर ४५ मिनिटांनी सूर्योदय आणि सूर्यास्त होतो. अंतराळवीराने २०१३ मध्ये गुजरातमध्ये एका कार्यक्रमादरम्यान ही माहिती दिली होती.