आता इस्रायलने येमेनवर बॉम्ब डागले: 12 जेट विमाने, वीज प्रकल्प तसेच होदियाह शहरातील बंदर उद्ध्वस्त


वृत्तसंस्था | तेल अवीव/ बैरुत4 दिवसांपूर्वी

  • कॉपी लिंक

लेबनॉननंतर इस्रायलने रविवारी येमेनवर मोठा हल्ला केला. इस्रायलने हौथी तळांवर बॉम्बवर्षाव व राॅकेट डागले. त्यात १२ जेट विमाने व वीज प्रकल्प तसेच होदियाह शहरातील बंदर उद्ध्वस्त झाल्याचे सांगण्यात आले. इस्रायलच्या हल्ल्यात इराणसमर्थित ४ हौथी बंडखोरांचा मृत्यू झाला. या घटनेत ५० हून जास्त जण जखमी झाले. इस्रायलने रविवारीदेखील लेबनॉनच्या अनेक शहरांवर रॉकेट डागले तसेच बॉम्बहल्लाही केला. हल्ल्यात हिज्बुल्लाह केंद्रीय परिषदेचा उपप्रमुख नबील कउक मारला गेला. लेबनॉनमध्ये हिज्बुल्लाहचा म्होरक्या हसन नसरल्लाचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे.

मृतदेहावर घाव दिसत नाहीत. त्याचा मृत्यू बहुदा गुदमरून झाला असावा. त्यातच नसरल्लावरील हल्ल्याची आपल्याला कल्पना होती, असे अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. इस्रायलने मोहिमेसाठी लढाऊ विमाने झेपावल्यानंतर त्याबद्दलची माहितीदेखील दिली होती, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. इस्रायलनेदेखील संदेश दिल्याचे म्हटले होते.

नसरल्लाचा भाऊ हाशिम नवा प्रमुख होऊ शकतो नसराल्लाहचा भाऊ हाशिम हिजबुल्लाचा नवा प्रमुख होऊ शकतो. ६० वर्षीय हाशिम हा शिया धर्मगुरू आहे. शुरा कौन्सिलचा सदस्य हाशिम याला अमेरिकेने दहशतवादी घोषित केले आहे. मात्र, नईम कासिम हाही प्रमुखपदाचा दावेदार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *