[ad_1]
तेल अवीव6 दिवसांपूर्वी
- कॉपी लिंक

इस्रायलने लेबनॉनमध्ये हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्ला याला ठार केले. तो बेरूतमधील हिजबुल्लाहच्या मुख्यालयात लपला होता. इस्रायली हल्ल्यात त्याच्यासोबत इराणी लष्कराचा डेप्युटी कमांडर अब्बासही मारला गेला. इस्रायली हवाई दलाने ३० मिनिटांत ८० बॉम्ब फेकले. हिजबुल्लाह मुख्यालयाची इमारत उद्ध्वस्त झाली. इस्रायली लष्कराने म्हटले की, नसरल्लाह यापुढे जगाला घाबरवणार नाही. हिजबुल्लाहने नसरल्लाच्या मृत्यूची पुष्टी केली. हजारो निरपराधांच्या हत्येचा दोषी नसरल्लाच्या हत्येतील पीडितांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला, असे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन म्हणाले. लेबनॉनमध्ये इस्रायली हल्ल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते खामेनींना सुरक्षित गृहात हलवले आहे. खामेनी यांनी मुस्लिम देशांना इस्रायलविरोधात येण्याचे आवाहन केले आहे.
शनिवारी रात्रीपासून इस्रायली लष्कराचे जोरदार हल्ले सुरू आहेत. मध्यंतरी झालेल्या हल्ल्यांमुळे राजधानी बेरूतमध्ये मोठे नुकसान झाले आहे आणि लेबनीज लोकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. बेरूतमधील ४०% पेक्षा जास्त इमारती नष्ट झाल्या आहेत. भीतीपोटी, लोक इमारती खाली करत आहेत व समुद्रकिनारी धावत आहेत, जेथे अनेकांना कार, पार्क आणि समुद्रकिनारी मोकळ्या रस्त्यांवर रात्र काढावी लागत आहे. फुटपाथवर गाद्या पसरून ते जगत आहेत. जोपर्यंत परिस्थिती सामान्य होत नाही तोपर्यंत आपण घरी जाऊ शकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. गेल्या आठवड्यात लेबनॉनच्या अनेक शहरात पेजर आणि वॉकीटॉकी हल्ल्यांनंतर शाळा आणि कॉलेज बंद आहेत.
१ वर्षात हिजबुल्लाहचे १० वरिष्ठ कमांडर ठार
एका वर्षात इस्रायलने हिजबुल्लाहच्या १० प्रमुख कमांडरांना ठार केले आहे. इराण समर्थित हिजबुल्लाहचे चार प्रमुख कमांडर इब्राहिम कबिसी, इब्राहिम अकील, अली काराकी आणि फौद सुक्रची गेल्या एका महिन्यांत इस्रायलकडून हत्या करण्यात आली. आता फक्त हिजबुल्लाहच्या बद्र युनिटचा कमांडर अबू अली रिदा हा बचावला आहे.
पुढे काय : आता पश्चिम आशियामध्ये युद्धाची आग भडकणार
हिजबुल्लाहला संघटना म्हणून पुन्हा प्रस्थापित होण्यासाठी वेळ लागेल. इस्रायलने हिजबुल्लाहचा खात्मा करून इराणला खुले आव्हान दिले आहे. इराणने केवळ वक्तव्यांपुरते मर्यादित राहून इस्रायलविरुद्ध कोणतीही ठोस कारवाई केली नाही तर पश्चिम आशियातील त्याची प्रतिष्ठा कमी होईल.
[ad_2]
Source link