[ad_1]
वृत्तसंस्था | न्यूयॉर्क7 दिवसांपूर्वी
- कॉपी लिंक

न्यूयॉर्कमध्ये आलमची ओळख करून देताना युनूस. मंचावर क्लिंटन (उजवीकडे)
- बांगलादेशातील हंगामी सरकारच्या प्रमुखांनी अमेरिकेत केला गौप्यस्फोट
बांगलादेशच्या हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार मोहंमद युनूस यांनी शेख हसीना यांना पदच्युत करण्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. हसीनांविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आल्याचे युनूस यांनी मान्य केले. ते न्यूयॉर्कमधील क्लिंटन ग्लोबल इनिशिएटिव्हच्या मेळाव्यात म्हणाले, या आंदोलनाचा मास्टरमाइंड २९ वर्षीय विद्यार्थी महफूज आलम होता. आलमच्या नेतृत्वाचे कौतुक करताना युनूस म्हणाले, हे आंदोलन इतक्या कार्यक्षम नेतृत्वातून चालवले की हसीना सरकारला याचा सुगावाही लागला नाही. युनूस स्टेजवरून आलमबद्दल म्हणाले, तो इतर तरुणांसारखा दिसतो. त्याला तुम्ही ओळखणारही नाही. मात्र, त्याला काम करताना बघाल, त्याचे बोलणे ऐकाल तेव्हा तुम्ही प्रभावित व्हाल. त्याने आपल्या भाषणाने, समर्पणाने आणि बांधिलकीने संपूर्ण बांगलादेशाला हादरवून सोडले आहे. युनूस म्हणाले, आलम आता बांगलादेशची नवी आवृत्ती तयार करण्यात व्यग्र आहे.
आता यूनुस यांचा विशेष सहायक आहे आलम, प्रत्येक निर्णयात करतो हस्तक्षेप : विद्यार्थी आंदोलनाद्वारे बांगलादेशच्या राजकारणात उदयास आलेला आलम आता यूनुस यांचा विशेष सहायक आहे. सरकारचे प्रमुख म्हणून यूनुस यांच्या प्रत्येक निर्णयात आलमची भूमिका असते. आलमने पोलिसांचा संप मोडित काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आलमला अब्दुल्ला (नेता) या नावाने ओळखले जाते.
- बांगलादेशात विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनानंतर ५ ऑगस्ट रोजी शेख हसीना पंतप्रधानपद सोडून भारतात आल्या होत्या. ८ ऑगस्ट रोजी मोहंमद युनूस हे हंगामी सरकारचे प्रमुख झाले होते.
[ad_2]
Source link