300 हून जास्त बांगलादेशींना विमानात बसवून केले रवाना: अमेरिकेच्या धर्तीवर गुजरात पोलिसांचे सिक्रेट ‘ऑपरेशन डिपोर्ट बांगलादेशी’

[ad_1]

  • Marathi News
  • National
  • Gujarat Police’s Secret ‘Operation Deport Bangladeshi’ On The Lines Of America, More Than 300 Bangladeshis Were Deported By Plane

मृगांक पटेल | सुरत1 तासापूर्वी

  • कॉपी लिंक

गुजरात पोलिसांनी ‘ऑपरेशन डिपोर्ट बांगलादेशी’ अंतर्गत ३०० हून अधिक बांगलादेशी नागरिकांना भारतातून परत पाठवले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर राज्यभरात विशेष शोधमोहीम राबवून या बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर तपास आणि कायदेशीर प्रक्रियेनंतर त्यांना टप्प्याटप्प्याने परत पाठवण्यात आले.

सूत्रांनुसार, अहमदाबाद आणि सुरतसह राज्यातील विविध शहरांमधून या बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. त्यांना विशेष विमानाने आगरतळा (त्रिपुरा) येथे पाठवण्यात आले. पुढील कारवाईसाठी त्यांना रस्त्याने नेण्यात आले. पहलगाम हल्ल्यानंतर २७ एप्रिल रोजी पोलिसांनी राज्यभरात अवैध बांगलादेशी नागरिकांची ओळख पटवून त्यांना अटक करण्याची मोहीम सुरू केली. अहमदाबादेत ८०० व सुरतमध्ये १३४ संशयित बांगलादेशी घुसखोर पकडले गेले.

घुसखोरांनी देशातून बाहेर जाण्यासाठी १० दिवस अवधी

अवैधरीत्या राहणारे आणि घुसखोरांना पकडल्यानंतर त्यांना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यास बराच वेळ लागतो. मात्र, या वेळी पोलिसांनी आधीच ठरवले होते की पकडलेल्या घुसखोरांना त्वरित परत पाठवले जाईल. ‘ऑपरेशन डिपोर्ट’ सुरू करून कारवाई पूर्ण करण्यासाठी पोलिसांनी १० दिवसांचा अवधी निश्चित केला होता.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *