फ्लाईट टेक ऑफ, लँडिंगच्या वेळी एअर होस्टेस त्यांच्या हातांवर का बसतात?

[ad_1]

Flight Take Off and Landing Rules : विमानानं प्रवास करण्याची जेव्हाजेव्हा संधी मिळते तेव्हा या प्रवासाची उत्सुकता असली तरीही त्यादरम्यान समोर येणारी नियमांची यादी पाहून अनेकांच्याच कपाळावर आठ्या पडतात. किती ते नियम… हा असा सूरही अनेकजण आळवतात. पण, तुम्हाला माहितीये का, की प्रवाशांसाठी आखलेले नियम तर काही नाही कारण, विमानात काम करणाऱ्या एअर होस्टेस आणि पायलटसह संपूर्ण क्रूलासुद्धा अशा काही नियमांचं पालन करावं लागतं. 

विमानानं प्रवास करत असताना या प्रवासादरम्यान प्रवाशांना काही हवं नको इथुपासून ते अगदी प्रवाशांच्या आरोग्यात काही चढ-उतार झाल्यास त्याचीही काळजी घेण्यातं काम हा फ्लाईट क्रू अर्थात विमानात असणाऱ्या एअप होस्टेस आणि पुरुष फ्लाईट अटेंडंट घेत असतात. या सर्व सेवा देत असताना त्यांना एक ना अनेक नियमांचं पालन करावं लागलं. मग तो नियम त्यांच्या पोषाखाशी संबंधित असो किंवा मग त्यांच्या चालण्याबोलण्याशी. विमान टेक ऑफ करताना किंवा लँड करतानाही या मंडळींना काही नियमांचं पालन करणं बंधनकारक असतं. किंबहुना त्यांना यासाठीचं प्रशिक्षणच दिलं जातं. 

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या काही व्हिडीओमध्ये असाच एक व्हिडीओ अनेकांचं लक्ष वेधून गेला, जिथं Cebu Pacific ची फ्लाईट अटेंडंट Henny Lim नं फ्लाईट अटेंडंटच्या बसण्याच्या पद्धतीवर भाष्य केलं. त्या नेमक्या त्यांच्या हातांवर का बसतात हे सांगितलं. 

लिमनं सांगितल्यानुसार ‘ब्रेसिंग पोझिशन’मुळं काही हालचालींना आवर बसतो. सीटबेल्ट लावून, ताठ बसल्यामुळं आणि हात जणू एखादं जास्तीचं कापड पलंगाच्या आत खोचलं जातं तशा काहीशा रचनेत ठेवत अंगठा आत घेऊन हात आत ठेवत त्यांच्यावर बसल्यानं दंड काहीसे सैल पडतात. बसण्याच्या या अशा रचनेमध्ये पाय सपाट पृष्ठावर स्थिरावले आहेत याचीही काळजी घेणं महत्त्वाचं. 

कोणत्याही अटीतटीच्या प्रसंगी शरीराची अवाजवी हालचाल प्रतिबंधीत करणं ही एक मोठी गोष्ट असून त्यामुळं नुकसानाची शक्यता कमी होते. फ्लाईट अटेंडंक कायमच कोणत्याही आपात्कालीन प्रसंगासाठीसुद्धा स्वत:ला कायम तयार ठेवतात, ज्यामुळं त्यांच्या बसणाची शैली ही काहीशी अनपेक्षित पण तितकीच वेगळी असते. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *