भारताचं पाकविरोधात ऑपरेशन सिंदूर सुरूच, केंद्रीय मंत्र्यांची माहिती

[ad_1]

Operation Sindoor : दहशतवाद्यांचा खात्मा केल्याशिवाय भारत शांत बसणार नाहीये.  कारण भारताचं ऑपरेशन सिंदूर पूर्ण झालं नसून ते सुरूच राहणार असल्याचं भारताच्या केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतानं ‘ऑपरेशन सिंदूरनं’ बदला घेतलाय. भारतानं पाकिस्तानमध्ये घुसत दहशतवाद्यांचा खात्मा केलाय. दरम्यान भारताचं ऑपरेशन सिंदूर अजून पूर्ण झालं नसून ते सुरूच राहणार असल्याचं भारताचे केंद्रीय मंत्री किरेण रिजीजू यांनी सांगितलंय.

तसंच आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत ऑपरेशन सिंदूरबाबतची माहिती सर्वपक्षीय नेत्यांना देण्यात आली आहे. दरम्यान भारताचं दहशवाद्यांविरोधातील भारताचं ऑपरेशन सिंदूर सुरूच राहणार असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे. सर्वपक्षीय बैठकीत गृहमंत्री अमित शहा,परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, राजनाथ सिंह इत्यादी उपस्थित होते. विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खरगे, असदुद्दीन ओवैसी यांची देखील उपस्थित होती. ऑपरेशन सिंदूरसाठी सर्वांनी सशस्त्र दलांचे कौतुक केलं

ऑपरेशन सिंदूरमध्ये 100 दहशतवादी मारले गेल्याची माहिती बैठकीत देण्यात आली आहे. दहशतवाद्यांविरोधातील कारवाई अजून पूर्ण झाली नसून, ऑपरेशन सिंदूर सुरूच असल्याचं केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे.  भारताच्या ऑपरेशन सिंदूरनं पाकिस्तानची चांगलीच घाबरगुंडी उडाली आहे. भारतानं दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यानंतर पाकिस्तानच्या आगळीकनंतर भारतानं पुन्हा पाकिस्तानवर हल्ला केलाय. त्यामुळे दहशतवादाला मुळासकट उखडून टाकण्यासाठी भारताचं ऑपरेशन सिंदूर हे सुरूच राहणार आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *