काय आहे स्वार्म ड्रोन टेक्नोलॉजी? ज्याचा वापर करून पाकिस्तानने भारतावर केला हल्ला

[ad_1]

India Attack On Pakistan : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात हल्ले होत असून वातावरण अतिशय तणावपूर्ण आहे. पाकिस्तानने जम्मू काश्मीर सोबतच राजस्थान आणि पंजाबच्या काही भागात हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला भारतीय सैन्याने परतवून लावले. सुरुवातीला समोर आलेल्या माहितीनुसार पाकिस्तानने भारतावर केलेल्या हल्ल्यात स्वार्म ड्रोनचा उपयोग केला होता. तेव्हा या स्वार्म ड्रोनची खासीयत काय आहे याबाबत जाणून घेऊयात. 

स्वार्म ड्रोनची खासीयत : 

मीडिया रिपोर्ट्सनुसार पाकिस्तानकडून ड्रोन स्वार्म टेक्नोलॉजिचा वापर करण्यात आला होता. ज्यात अनेक ड्रोन एकत्र मिळून हल्ला करतात. ही टेक्नॉलॉजी एअर डिफेन्स हे तंत्र शत्रूच्या हवाई संरक्षण प्रणालींना भेदण्यासाठी प्रभावी आहे. स्वार्म ड्रोन हे एकत्र वेगवेगळ्या अँगलने टार्गेटवर हल्ला करू शकतात. ज्याच्या मदतीने रडार अँटेना, शस्त्र प्रणाली किंवा कमांड सेंटर यासारख्या महत्त्वाच्या लक्ष्यांना लक्ष्य केले जाऊ शकते.

स्वार्म टेक्नोलॉजी : 

स्वार्म टेक्नोलॉजीने चालणाऱ्या या ड्रोन्समध्ये हाय रिज़ॉल्यूशन कॅमेरे, थर्मल इमेजिंग आणि GPS आधारित नेविगेशन सिस्टम होती. स्वार्म टेक्नॉलॉजीने बनलेल्या या ड्रोनचे काही मॉडेल्समध्ये आर्टिफिशल इंटेलिजेंस आणि मशीन लर्निंगचा वापर केला जातो. जे एका मार्गदर्शित शस्त्रासारखे निर्णय घेण्यास मदत करतो. स्वार्म ड्रोन सिस्टममध्ये मोठ्या संख्येने असे एरिअल व्हीकल्स  असतात, जे आर्टिफिशियल-इंटेलीजेंसने युक्त आहेत. या ड्रोन्सची गती  50 मैल प्रति तास इतकी मर्यादित आहे. एआय टेक्नॉलॉजीने ड्रोन हे कंट्रोल सेंटर सोबत संपर्कात असतात. सोबतच आपसात जोडलेले सुद्धा असतात. एआयच्या स्वत: च्या अल्गोरिदममुळे, हे सर्व ड्रोन त्यांची स्वतःची जबाबदारी सामायिक करतात. ते शोध क्षेत्रात देखील कामगिरी करतात आणि टार्गेटला लक्ष्य करतात.

भारताकडेही आहेत असे ड्रोन : 

मोठ्या क्षेपणास्त्रांच्या तुलनेत या ड्रोनची किंमत कमी असते. स्वार्म टेक्नॉलॉजीने चालणारे ड्रोन भारताकडे सुद्धा असून ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने सुद्धा याचा वापर केला होता. 7 मे रोजी भारतीय लष्कराच्या वतीनं सैन्यदल आणि वायुदलानं संयुक्तरित्या ऑपरेशन सिंदूर ही मोहिम हाती घेत यशस्वीरित्या पाकिस्तानातील दहशतवादी तळ उध्वस्त केले. यावेळी अतिशय नियोजित आणि केंद्रीत असे हल्ले पाकिस्तानी तळांवर करण्यात आले. या ऑपेरेशन सिंदूरमध्ये (Operation Sindoor) भारतीय सैन्याने पाकिस्तानातील 4 आणि जम्मू काश्मीरमधील 5 म्हणजेच एकूण 9 आतंकवादी ठेक्यांना लक्ष केलं गेलं. 

 08 मे च्या रात्री, पाकिस्तानने अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज यासह उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी लक्ष्यांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण भारताने पाकिस्तानचा मनसुबा उधळून लावला. भारताकडून पाकिस्तानची एअर डिफेन्स यंत्रणा उद्ध्वस्त करण्यात आली. या हल्ल्याला प्रतिउत्तर देण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांनी आज सकाळी पाकिस्तानमधील लाहोरमसह अनेक ठिकाणचं हवाई संरक्षण रडार आणि प्रणालीला लक्ष्य केलं. भारताकडून हॅरोप ड्रोनचा वापर करण्यात आला. यादरम्यान पाकिस्तानातील प्रसिद्ध रावळपिंडी स्टेडियम सुद्धा भारताच्या हल्लयात उध्वस्त झालं. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *