भारतीय शेअर बाजारात मोठा धमाका! फक्त 10 सेकंदात 300000000000 रुपयांचा चुराडा

[ad_1]

Pakistan Stock Market Crashed Today News:  भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने देखील पलटवार केला आहे.  जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशासह भारताच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानने हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील प्रमुख शहरांमध्ये प्रतिकार सुरू ठेवला. दोन्ही देशांमध्ये तणवा स्थिती आहे. याच युद्धजन्य परिस्थितीचा पहिला फटका दोन्ही देशांच्या शेअर मार्केटना बसला आहे. भारतीय शेअर बाजारात मोठा धमाका पहायला मिळाला. फक्त 10 सेकंदात 300000000000 रुपयांचा चुराडा झाला आहे. तर पाकिस्तान शेअर बाजारही ठप्प झाला आहे.  

भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केल्याने गुंतवणूकदारांमध्ये भीती निर्माण झाली. कराची आणि लाहोरसह प्रमुख शहरांमध्ये ड्रोन पाडल्याच्या बातम्यांनी बाजारातील घबराट वाढवली. सकाळी बाजार सुरु होताच भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पहायला मिळाली. बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 925 अंकांनी किंवा 1.2 टक्क्यांनी घसरला, तर एनएसईचा निफ्टी 156 अंकांनी घसरून 24, 117  वर पोहोचला.

जागतिक शेअर बाजारात मिश्र संकेत पहायला  मिळाले.  देशांतर्गत इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांमध्ये मोठी घसरण झाली आहे स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर्समध्येही घसरण झाली आहे. एकूणच, बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 3.48 लाख कोटी रुपयांनी घसरले आहे, म्हणजेच बाजार उघडताच गुंतवणूकदारांचे  3.48 लाख कोटी बुडाले.  इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांवर नजर टाकली असता.  बीएसई सेन्सेक्स 879.54  अंकांनी घसरला. 

पाकिस्तान शेअर बाजारात मोठी घसरण 

भारत-पाकिस्तान तणाव वाढत असताना पाकिस्तानच्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. कराची स्टॉक एक्सचेंज (KSE) मध्ये गुरुवारी व्यवहार एक तासासाठी थांबवण्यात आले, कारण KSE-100 निर्देशांक 6.3% खाली घसरला.
बाजारातील घसरण: KSE-30 निर्देशांक 7.2% आणि KSE-100 निर्देशांक 6.61% खाली घसरल्याने बाजारात घबराट पसरली. 22 एप्रिलपासून KSE-100 निर्देशांक 15,000 अंकांनी घसरला आहे, जो 1,18,312 वरून 1,03,060.30 वर आला.

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *