[ad_1]
Monsoon 2025 : गेल्या काही दिवसांपासून अंदमान आणि निकोबार बेट समुहांमध्ये वाऱ्यांचा वेग आणि त्यांची दिशा पाहता मान्सूनसाठी पूरक वातावरणनिर्मिती होतना दिसली. परिणामी हवामान संस्थांनीसुद्धा या प्रणालीवर लक्ष ठेवत अखेर संपूर्ण तणावाच्या परिस्थितीमध्ये एक सुखावणारं वृत्त जारी केलं. अर्थात हे वृत्त आहे यंदाच्या वर्षीच्या मान्सूनचं. या निरीक्षणापूर्वीच मान्सूनचा पहिला अंदाज वर्तवण्यात आला होता जिथं यंदा देशभरात मान्सून सामान्य स्थितीत असेल असं सांगत दिलासा देण्यात आला होता आणि आता थेट हा मान्सून केरळात केव्हा दाखल होणार आहे याची तारीखही जारी करण्यात आली आहे.
यंदाच्या वर्षात र्नैऋत्य मोसमी पाऊस निर्धारित वेळेत भारतात दाखल होण्यास पूरक वातावरण असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. ज्यानुसार भारतावर सर्वाधिक परिणाम करणारा मान्सून हा केरळमध्ये 27 मे रोजी म्हणजेच मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दाखल होणार आहे.
र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली असून, त्यामुळं वाऱ्यांचा वेगही वाढला आहे, ज्यामुळं केरळात मान्सून मे महिन्यातच धडकणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वीच मान्सून अंदमान आणि निकोबार बेटांवर 11 मे रोजी दाखल होणार असल्याचं सांगण्यात आल्यानं तो केरळात आणि पर्यायी महाराष्ट्रातही मागील वर्षीच्या तुलनेत काहीसा आधीच दाखल होईल अशी प्राथमिक शक्यता वर्तवण्यात आली होती.
2024 मध्ये मान्सून 19 मे रोजी अंदमान-निकोबार बेटांवर दाखल झाला होता. ज्यानंतर हे र्नैऋत्य मोसमी वारे 30 मे पर्यंत, निर्धारित वेळेआधी केरळात दाखल झाले होते. यंदा मान्सून त्याहीआधी केरळात धडकण्याची शक्यता असल्यानं ही बातमी सध्या अनेकांनाच दिलासा देऊन जात आहे. मागील पाच वर्षांमध्ये मान्सूनची अंदमान ते केरळ अशी वाटचाल पाहिली असता सामान्यत: जून महिन्याच्या पहिल्या दिवसापर्यंत हे वारे दाखल होण्यास पूरक वातावरणनिर्मिती होत असते. मात्र पाच वर्षांचा आढावा घेतल्यास त्याच्या आगमनाचा काळ काही दिवस मागे येत असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळं 27 मे ते 5 जूनदरम्यानचा काळ मान्सूनच्या आगमनास पूरक असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान महाराष्ट्रात मान्सून केव्हा धडकणार याची अधिकृत तारीख अद्याप समोर आलेली नाही. मात्र मोसमी वाऱ्यांचा वेग आणि त्यांच्यामध्ये होणारी प्रगती पाहता महाराष्ट्रात तो नेमका कधी दाखल होईल याची तारीखही लवकरच समोर येईल हे नाकारता येत नाही.
मागील पाच वर्षांत केरळमध्ये पाऊस केव्हा दाखल झाला?
2024- 30 मे
2023- 8 जून
2022- 29 मे
2021- 3 जून
2020- 1 जून
यंदा चांगल्या पावसाचा अंदाज
जून ते सप्टेंबर या कालावधीत 105 टक्के पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. देशासह महाराष्ट्रातही यंदा चांगल्या पावसाची शक्यता असून, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण अधिक राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
[ad_2]
Source link