[ad_1]
Jammu and Kashmir : (India Pakistan tension) भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील तणावाची परिस्थिती अद्यापही निवळली नसून, संरक्षण यंत्रणा विविध स्तरांवर आता तपास करताना दिसत आहेत. त्याच धर्तीवर तपासातून आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, जिथं काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे मारत स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम इथं बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, काश्मीरमध्ये प्रचंड तणाव पाहायला मिळाला. सरकारने दहशतवादी आणि त्यांना मदत करणाऱ्यांविरोधात मोहीमा अधिक तीव्र करत लष्करी कारवाईचाही निर्णय घेतला. दहशतवादाला समूळ नष्ट करण्यासाठी भारताकडून सातत्यपूर्ण प्रयत्न केले जात असतानाच स्थानिक पोलिसांनीही कठोर कारवाईला सुरुवात केली. ज्याअंतर्गत दक्षिण काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे टाकून स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यात आला.
सदर कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आल्या. तर, काही संशयितांना ताब्यात घेत त्यांना पुढील चौकशीसाठी पाठवण्यात आलं. राज्य तपास संस्था अर्थात (SIA) नं याबाबतची माहिती देत एका प्रसिद्धीपत्रकात याबाबतचा तपशील मांडला.
जम्मू-काश्मीर पोलीस सध्या काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या आणि दहशतवाद्यांना कटकारस्थानं रचण्यात मदत करणाऱ्या सहकाऱ्यांवर आणि ओव्हरग्राउंड वर्कर्सवर करडी नजर ठेवून आहेत. या तपासातून आणि गुप्तचर यंत्रणांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार काश्मीरमधून अनेकजण थेट सीमेपलिकडे सक्रिय असणाऱ्या दहशतवाद्यांसह त्यांच्या म्होरक्यांच्या संपर्कात होते. जिथं ते टेलिग्राम, सिग्नल आणि व्हॉट्सअप मेसेजच्या मदतीनं स्थानिक संरक्षणातील काही महत्त्वाच्या गोष्टींसह संरक्षण दलांसंदर्भातील संवेदनशील माहिती तिथवर पोहोचवत होते.
कट्टरतावादाला खतपाणी…
काश्मीरमध्ये सक्रिय असणाऱ्या या स्लीपर सेल लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांसारख्या दहशतवादी संघटनांकडून येणाऱ्या आदेशांनुसार या स्लीपर सेल भारताच्या या सीमाभागात कट्टरतावादाला खतपाणी घालण्याचं काम करत होते. ऑनलाईन माध्यमांचा ते इथं वापर करत होते. ज्यामुळं देशाच्या सुरक्षिततेमध्ये अनेक स्तरावर धोका निर्माण झाला आणि दिवसागणिक त्यात भरही पडली. सध्या अशा सर्व स्लीपर सेल हेरून त्यांवर कारवाई करत दहशतवादाचा कणाच मोडण्यासाठी भारतीय संरक्षण दल कारवाई करत आहे.
[ad_2]
Source link