[ad_1]
दिव्य मराठी नेटवर्क | न्यूयॉर्क16 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

स्ट्रँड बुक स्टोअरमधील लग्नसोहळा
- अमेरिकेतील ट्रेंड… लोक पुस्तकांच्या प्रेमाला छंद-उत्सवांसोबत जोडत आहेत
अमेरिकेमध्ये आता बुक स्टोअर केवळ पुस्तके खरेदी करण्याची जागा राहिलेली नाहीयेत. ती आता लोकांच्या भेटीगाठी आणि गप्पागोष्टींची हक्काची जागा बनली आहेत. अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने चालणारे हे स्टोअर आता ग्राहकांना कॉफी, स्नॅक्स आणि डिनरसोबत एक खास अनुभव देत आहेत. इथे आता साखरपुडा आणि लग्नासारख्या कार्यक्रमांसोबतच चित्रपटांचं शूटिंगसुद्धा होत आहे. हा ट्रेंड आता संपूर्ण अमेरिकेत दिसत आहे.
या स्टोअर्सचा उद्देश फक्त पुस्तकं विकणं नाही, तर लोकांना एक असं वातावरण देणं आहे जिथे ते वाचण्यासोबत खाण्यापिण्याचा आनंद घेऊ शकतील. त्याचबरोबर आपले खास क्षण साजरे करू शकतील. अमेरिकेतील स्टोअर्ससोबत इटलीहून आलेल्या रेस्टॉरंट स्टाइल बुक स्टोअरनीही हाच मार्ग स्वीकारला आहे. न्यूयॉर्कमधील जवळपास १०० वर्षं जुनं ‘स्ट्रँड’ स्टोअर आता एक सोशल स्पेस बनलं आहे. पहिल्या मजल्यावरचा एक कोपरा आता कॅफेमध्ये बदलला आहे, जिथे कॅपुचीनो आणि स्नॅक्स मिळतात. तिसऱ्या मजल्यावर दुर्मिळ पुस्तकांच्यामध्ये एक इव्हेंट स्पेस आहे, जिथे बुक लॉन्च, लेखकांची स्वाक्षरी, कर्मचाऱ्यांच्या मीटिंग्ज आणि इतर कार्यक्रम होऊ लागले आहेत. इथलं वातावरण एखाद्या जुन्या लायब्ररीसारखं आहे.
इटालियन रेस्टॉरंट स्टाईल बुक स्टोअर ‘सुलालुना’मध्ये पास्ता डिशसोबत इटालियन पुस्तकं मिळतात. मुलांसाठीच्या पुस्तकांना आर्ट गॅलरीसारखं सादर केलं जातं. बिलसुद्धा मुलांच्या पुस्तकांमध्ये ठेवून देतात, जसं की ‘द केस ऑफ द कॅट्स म्याऊ’. स्टोअरच्या सह-संस्थापक फ्रांसेस्का रिजी सांगतात, ‘जेव्हा आम्ही मुलांना पुस्तकं देतो, तेव्हा आम्ही हे विसरत नाही की हा त्यांच्यासाठी खास अनुभव असतो. ही पुस्तकं त्यांच्यासाठी आर्ट गॅलरीसारखी असतात, जी त्यांची विचार करण्याची क्षमता आणि बघण्याची शक्ती वाढवायला मदत करतात. त्याचबरोबर, ती त्यांची सौंदर्य अनुभवण्याची भावना विकसित करायला मदत करतात.’ उत्कृष्ट साहित्यासोबत खानपानाचं नातं अतूट, लोकांची हीच इच्छा स्ट्रँडच्या मार्केटिंग डायरेक्टर कॅट पोंग्रेस म्हणतात की लोकांना त्यांच्या आयुष्यातील खास क्षण अशा गोष्टींसोबत घालवायला आवडतात, ज्या त्यांच्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. पुस्तकं वाचणं भावनिकदृष्ट्याही खास असतं. बिब्लिओथेकचे मालक, अँड्र्यू जेसन म्हणतात, उत्कृष्ट साहित्य वाचण्याचा अनुभव आणि आवडत्या पदार्थांच्या चवीचा आनंद यांच्यात एक अतूट नातं आहे.पुसत्के आपल्या विचारांवर प्रभाव टाकतात.
[ad_2]
Source link