13 वर्षांच्या तरुणीवर 12 जणांकडून सामूहिक बलात्कार, पीडितेच्या आईच्या डोळ्यांदेखतच…

[ad_1]

Chennai Crime News: चेन्नई येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 13 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी 12 जणांना अटक केली असून त्यात 6 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. या घटनेचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा, मुलीने पोटदुखीची तक्रार तिच्या आईकडे केली. आईने तिला चेंगलपट्टू येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. तेव्हा ती गर्भवती असल्याचे उघड झाले. तेव्हा अल्पवयीन मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. 

रुग्णालय प्रशासनाकडून पल्लवरम पोलिसांना सूचना देण्यात आल्या होत्या. पोलिसांनी पिडीतेच्या तक्रारीच्या आधारे आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो अॅक्टअंतर्गंत तक्रार दाखल करुन तपास सुरू केला आहे. पुराव्याआधारे आरोपींची ओळख तपासण्यात आली असून 12 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात सहभागी असल्याच्या संशयावरुन पोलिसांनी पीडितेच्या आईलादेखील अटक केली आहे आणि तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन तरुणी दिवसभर घरात एकटीच पाहत होती. तिचे आई-वडील दोघही कामाच्या निमित्ताने घराबाहेर असायचे. या दरम्यानच एक अल्पवयीन आरोपी तिच्या घरी दररोज पाण्याच्या बॉटल देण्यासाठी यायचा. तेव्हा मुलीली एकटीला घरात पाहून त्याने  तिच्यावर अत्याचार केला. पीडितेने तिच्या आईला याविषयी आधीच सांगितले होते. मात्र आईने तिलाच धमकी देत याविषयी कोणालाही न सांगण्याविषयी सांगितले. त्यामुळं आरोपींचे धाडस वाढले. काही दिवसांनंतर आरोपी त्याच्या आणखी एक मित्राला घेऊन त्यांच्या घरी पोहोचला. तेव्हा दोघांनीही तिच्यावर बलात्कार केला. त्यादिवसापासून ही घटना सातत्याने होऊ लागली. 

पीडित तरुणीवर सातत्याने बलात्कार होत होता. तिने याविषयी तिच्या आईकडेदेखील तक्रार केली होती. मात्र तिच्या आईने याकडे दुर्लक्ष केले. याच दरम्यान पीडिता गर्भवती राहिली तेव्हा या घटनेचा खुलासा झाला. आरोपींची ओळख पटली आहे. नंदकुमार (19), संजय कुमार (18), संजय (18), मुदिचुर सूर्या (22), ईसा पल्लवरम निक्सन (22) आणि सात अल्पवयीन आरोपी अशी आरोपींची ओळख पटली आहे. हे सर्व आरोपी पीडितेच्या घराशेजारीच राहत होते. पीडितेच्या आईसह सर्व 18 वर्षांच्या वर असलेल्या आरोपींना तुरुंगात पाठवण्यात आले आहेत. तर, अल्पवयीन आरोपींना सुधार गृहात पाठवण्यात आले आहे. पीडितेला देखील एका सरकारी कल्याण केंद्रात ठेवण्यात आले आहे. तिथे तिच्यावर समुपदेशन सुरू आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *