विनाश, महाविनाश आणि तबाही… फक्त 3 शब्दात PM मोदींनी सांगितला भारताचा पाकिस्तानविरोधातील महाभयानक प्लान

[ad_1]

PM Modi adampur airbase Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी पंजाबमधील आदमपूर हवाई तळाला भेट दिली. वायुदलाच्या बहाद्दर हवाई योद्ध्यांची नरेंद्र मोदींनी कौतुकाने पाठ थोपटली.  विनाश, महाविनाश आणि तबाही… या 3 शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी पाकिस्तानविरोधातील प्लान सांगितला.

जेव्हा भारताचे सैनिक भारत माता जय अशी घोषणा करतात तेव्हा शत्रूचा थरकाप उडतो. जेव्हा आपले ड्रोन, मिसाईल निशाणावर मारा करतात. तेव्हा शत्रूला ‘भारत माता की जय’ असा आवाज  ऐकायला येतो. आपले सैनिक न्यूक्लीअरची धमकी देणाऱ्यांची हवा काढतात. भारतीय सैनिकांनी इतिहास रचला आहे. भारताच्या पराक्रमाची भविष्यात इतिहासात नोंद होईल. हा लढा येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणादयी ठरेल. आर्मी, नेव्ही, एअरफोर्ससह BSF जवानांचे शौर्यामुळे ऑपरेशन सिंधू यशस्वी झाले. 

ऑपरेशन सिंधू साधी मोहिम नाही. ही मोहिम भारताविरोधात दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना धड शिकवण्यासाठी आहे. भारतीय सैन्याने 9 आतंकी ठिकाण नष्ट केले आहेत. 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारतातील निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्यांना  सोडणार नाही. दहशवाद्यांना आसरा देणाऱ्या पाकिस्तानच्या घरात घुसून हल्ला करणार.

भारताची ताकद पाहून पाकिस्तानचा थरकाप उडाला आहे. यापुढे भारतावर हल्ला केला तर पाकिस्तानला सोडणार नाही असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. पाकिस्तातने आता भरातावर हल्ला केला तर सोडणान नाही. आता  भारतावार हल्ला केला तर आम्ही आमच्या पद्धतीने हल्ला करणार.  न्यूक्लीअर हल्ल्याची धमकी सहन करणार नाही.   दहशतवाद्यांना सहकार्य करणाऱ्यांना सोडणार नाही असा इशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.  ऑपरेशन सिंधूचा एक एक क्षण भारतीय सैन्याच्या ताकदीचे प्रचिती देतोय. 

कोणतीही सूचना न देता नरेंद्र मोदींनी वायुदलाच्या हवाई योद्धांची भेट घेतली. आदमपूर हवाई तळ (पंजाब) हा भारतीय हवाई दलाच्या मिग-29 चा तळ आहे. येथील स्क्वॉड्रनला ब्लॅक आर्चर्स म्हणून ओळखले जाते.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *