‘चिकन नेक’… भारताच्या नकाशावर दिसणारी एक अरुंद वाट; India china तणावात का होतेय या ठिकाणाची चर्चा?

[ad_1]

India China Tension : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये असणाऱ्या तणावात दर दिवशी भर पडत असतानाच शस्त्रसंधी झाली आणि काही अंशी का असेना पण, हा तणाव कमी झाल्याचं दिसून आलं. त्यातच एकिकडे हा तणाव असतानाच दुसरीकडे भारतानं चीनच्या खुरापतींवरही कटाक्ष टाक परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीनं या शेजारी राष्ट्रालासुद्धा खडे बोल सुनावण्यात आले आहेत. 

अरुणाचल प्रदेशातील काही भागांना चिनी नावं दिल्याबद्दल चीननं हे कितीही प्रयत्न केले तरीही वास्तव बदलणार नाही अशाच शब्दांत भारतानं खडसावलं. यातच एका अका अशा ठिकाणाची चर्चा सुरू झाली, ज्याचं  भारत आणि चीन या दोन्ही देशांसाठी अनन्यसाधारण महत्त्वं आहे. हे ठिकाण म्हणजे, चिकन नेक. 

कुठे आहे चिकन नेक? 

सिलीगुडी कॉरिडोअरचं नाव तुम्ही ऐकलं असेल. हा तोच अतिशय संवेदनशील परिसर आहे, ज्याला ‘चिकन नेक’ म्हणूनही संबोधलं जातं. अतिशय चिंचोळा, अरुंद असा हा रस्ता संपूर्ण पूर्वोत्तर भागाला देशाच्या उर्वरित भागाशी जोडण्याचं काम करतो. 

भारतात असणारा हा सिलीगुडी कॉरिडोअर चिकन नेक म्हणून संपूर्ण जगाचं लक्ष वेधतो. कारण, हा भाग अतिशय अरुंद असला तरीही देशाच्या दृष्टीनं मात्र तो प्रचंड महत्त्वाचा आहे. पश्चिम बंगालमध्ये येणारा हा भाग म्हणजे प्रत्यक्षात अरुंद रस्ता असून हा तोच रस्ता आहे ज्यामुळं पूर्वोत्तर 8 राज्य देशाशी जोडली जातात. 

या रस्त्याचा एकंदर आकार आणि त्याचं क्षेत्रफळ पाहता या भागाला चिकन नेक असं नाव देण्यात आलं आहे. हा रस्ता फक्त 26 ते 22 किमी इतक्याच अंतराता असून, तो देशातील अतिशय संवेदनशील भागांपैकी एक ग्राह्य धरला जातो. शत्रू राष्ट्रांच्या वक्रदृष्टीनं जर कधी या भागावर हल्ला होऊन भारतानं चिकन नेक कमावला तर, आठ राज्य देशापासून वेगळी होण्याचा धोका संभवतो. यामध्ये अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा या राज्यांचा समावेश आहे.

नकाशावरही स्पष्ट दिसतो हा भाग…

हा भागा सिलीगुडी इथं असून, पश्चिम बंगालच्या उत्तरेला दार्जिलिंग आणि जलपायगुडी इथंच हा भाग आहे. हिमालयाच्या पायथ्याशी असणारं पश्चिम बंगालचं हे क्षेत्र 60 किमी लांब आणि 21 ते 26 किमी रुंद क्षेत्र आहे. सिलीगुडी कॉरिडोअर म्हणूनही हा भागा ओळखला जातो, जिथं भारत, बांगलादेश आणि नेपाळच्या सीमा एकत्र येतात. 

सिक्कीम, तिबेटची चुंबी व्हॅली आणि भूटानच्या डोकलामचं ट्राय जंक्शन याच भागात असून, नकाशात व्यवस्थित पाहिल्यास हा भाग पाहताक्षणी कोंबडीच्या मानेसारखा दिसतो. इथून पुढे जाणारा राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वेमार्ग पूर्वोत्तर राज्यांना देशाशी जोडण्याचं ताम करतात. या भागातही सैन्यदलाचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळतो. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *