हे गोवा नाही तर मुंबईजवळच शहर! तब्बल 13 दिवसांपासून रस्ता पाण्याखाली; पाहा Video


राजा मयाल, प्रतिनिधी वसई, 29 जुलै : गेल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे वसई विरार भागात नदी नाले ओसांडून वाहत आहेत. वसईतील गास-सनसिटी रस्ता हा सलग 13 दिवसापासून पाण्याखाली गेला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली आहे. या रस्त्याच्या ड्रोन व्हिडीओमधून याची दाहकता समजू शकते. दरम्यान, मुख्य रस्ता पाण्याखाली गेला असल्याने येथील स्थानिक गावातील तरुणांनी प्रशासनाच्या विरोधात आज आगळवेगळं आंदोलन केलं आहे. तरूणांचं पाण्यात बसून आंदोलन सलग 13 दिवसापासून वसईतील गास – सनसिटी  रस्ता हा पाण्याखाली गेला आहे. गास गावातील आम्ही गासकर या संघटनेच्या तरुणांनी गास सनसिटी रस्त्यावर पाण्यात बसून, ठिय्या आंदोलन केलं. यावेळी प्रशासनाविरोधात घोषणा देण्यात आल्या. गास सनसिटी रस्त्याचा वापर नालासोपारा, भुईगाव, निर्मळ, गास, विरार पासून 25 ते 30 हजार नागरिक नियमित करत असतात. वसई रेल्वे स्थानक या रस्त्याने काही वेळातच गाठता येते. सनसिटी, चुळणे रस्त्यावर बाजूलाच लागून संपूर्ण खाडी क्षेत्र असल्याने खास करून पावसाळ्यात समुद्रात भरती आली की हे पाणी सुध्दा या गासच्या रस्त्यावर येते आणि इथला संपूर्ण मार्गच बंद होतो.

दरवर्षीप्रमाणे पालिका आणि वाहतूक पोलीस हा रस्ता बंद करतात. येथील नागरिकांना वसई गाव अथवा देवतलाव असा दुहेरी वळसा घेत निर्मळ मार्गे नालासोपारा अथवा पुन्हा वसईत येण्यासाठी लांबपल्ल्याचा प्रवास करून शेवटी घर गाठावे लागत आहे. आजारी माणसे, कामावर जाणीरे चाकरमनी यांना हा रस्ता बंद असल्यामुळे मोठा त्रास होत आहे. यावेळी तर 13 दिवस रस्ता बंद झाला आहे. रस्त्याचं चित्र बघता, आणखीन तीन ते चार दिवस लागू शकतो, ते ही पाउस पडला नाही तर त्यामुळे येथील नागरिकांना आज आपल्या भावना व्यक्त करत आंदोलन केलं. वाचा –
पावसाळ्यात कधी न पाहिलेले पुण्याजवळील टॅाप 6 धबधबे PHOTOS
विरारमध्ये पावसाची उसंत विरारमध्ये दुपारपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे सायंकाळच्या सुमारास नागरिकांची बाजारात गर्दी झाली आहे. विरार पूर्व कारगिल नगर, मनवेल पाडा बाजार पेठेत जीवन आवश्यक वस्तू घेण्यासाठी लोक भायेर पडले आहेत. मागच्या आठदहा दिवसापासून वसई विरार नालासोपारा परिसरात पावसाने हाहाकार माजवला होता. आज दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने नागरिक बाजारात खरेदीसाठी आले आहेत. संततधार सुरू असल्याने नागरिकांचे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं होतं. जीवनावश्यक वस्तू घेणेदेखील नागरिकांना मुश्किल झालं होतं. आता परिस्थिती पूर्व पदावर येत असल्याने नागरिकांमध्ये एक समाधान व्यक्त होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *