मुंबई, 29 एप्रिल : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शुक्रवारी सायन कोळिवाड्याचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. यावरून उद्धव ठाकरे यांनी शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बिनकामाची माणसं जाऊद्या, त्यामुळे शिथिलता आलेला शिवसैनिक पेटून उठेल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते शिवसैनिकांशी संवाद साधताना बोलत होते. शुक्रवारी सायन कोळिवाड्याचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आज सायन कोळिवाडा येथील शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आम्ही तुमच्यासोबतच आहोत असं अश्वासन त्यांनी उद्धव ठाकरेंना दिलं. त्यानंतर त्यांच्याशी संवाद साधलताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मोठी बातमी! भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर; पंकजा मुंडेंकडं महत्त्वाची जबाबदारी
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे? उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘आपल्याला गद्दारांना गाडायचं आहे. मिंधे आणि भाजपला सांगतो दर आठवड्याला माझा एक माणूस फोडा, त्यामुळे शिथिलता आलेले शिवसैनिक पेटून उठतील. बिनकामाची माणसं जाऊद्या, एक-एक फोडण्यापेक्षा निवडणुका घ्या’ असं थेट आव्हानच उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना केलं आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या या टीकेल शिवसेना काय प्रत्युत्तर देणार हे पहाण महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :