मुंबई, 29 जुलै : मुंबई पोलिसांनी कुलाब्यातील छाबडा हाऊस इथे सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या लक्ष्यांपैकी एक असलेल्या छाबडा हाऊसची गुगल इमेज, राजस्थानमध्ये हल्ल्याची योजना आखण्यासाठी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींकडून जप्त करण्यात आली आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनंतर या माहितीनंतर पोलिसांनी कुलाबा येथील ज्यू कम्युनिटी सेंटरमध्ये सुरक्षा वाढवली आहे. महाराष्ट्र एटीएसने काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांकडून मोहम्मद इम्रान मोहम्मद युनूस खान आणि मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी यांना ताब्यात घेतले होते. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना त्यांच्याकडून छाबडा हाऊसची गुगल इमेज मिळाली आहे. महाराष्ट्र एटीएसनं, मुंबई पोलिसांना माहिती दिल्यानंतर लागलीच या केंद्रावरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. हे दोघेही राजस्थानमधील रतलामचे रहिवासी असून ते सध्या महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही आरोपींवर एनआयएनं पाच लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केलं होतं. हे दोघंही आरोपी अल सुफा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचंही तपासात निष्पन्न झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :