मुंबई, 29 एप्रिल, तुषार रुपनवार : पूरग्रस्त भागातील दुकानं आणि टपरीधारकांसाठी राज्य शासनानं ऐतिहासिक निर्णय घेताला आहे. आता अतिवृष्टी झालेल्या भागातील दुकानांना आणि टपरीधारकांना देखील मदत मिळणार आहे. राज्य शासनाने विशेष दरानं मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. जून ते ऑक्टोबर 2023 या पावसाळी हंगामात नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना मदत मिळणार आहे. नुकसानीच्या 75 टक्के किवा जास्तीत जास्त 50 हजारांपर्यंत दुकानदारांना मदत मिळणार आहे. तर टपरीधारकांना नुकसानीच्या 75 टक्के किंवा कमाल दहा हजारांपर्यंत मदत मिळणार आहे. महसूल व वनविभागाकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. छोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा दरम्यान शासनाच्या या निर्णयामुळे छोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मदत मिळते. मात्र अनेकदा छोटे व्यापारी ज्यांची दुकानं आहेत, तसेच टपरीधारक यांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यास त्यांना कोणतीही मदत मिळत नाही. मात्र आता अशा दुकानदारांना आणि टपरीधारकांना मदत करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. नुकसानीच्या 75 टक्के किवा जास्तीत जास्त 50 हजारांपर्यंत दुकानदारांना मदत मिळणार आहे. तर टपरीधारकांना नुकसानीच्या 75 टक्के किंवा कमाल दहा हजारांपर्यंत मदत मिळणार आहे.
बुलढाणा बस अपघात, मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून मदत
अतिवृष्टीमुळे नुकसान दरम्यान चालू महिन्यात राज्यभरात पावसानं कहर केला आहे. सुरू असलेल्या संततधारेमुळे लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे. एवढंच नाही तर अनेक भागांत पुराचं पाणी घरात घुसल्यामुळे अनेकांचे संसार वाहून गेले. या पुराचा फटका हा छोट्या व्यापाऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणावर बसला. अशा व्यापाऱ्यांना आता सरकारच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा आपल्या व्यवसायाची घडी बसवण्यास मदत होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :