इर्शाळवाडी दुर्घटनेवरून आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये कलगीतुरा; नेमकं काय घडलं?


मुंबई, 28 जुलै : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची एक मुलाखत नुकतीच पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शेलक्या शब्दात उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर टीका केली. काहीतरी एक दोन दिवसांपुर्वी कुणीतरी मुलाखत घेतली. जाऊ दे मी त्यात पडत नाही. घरगुती मुलाखत होती. डबल इंजिनचं काम पाहून अजित पवार आमच्या बरोबर आले आहे. ट्रिपल इंजिनचं काम वेगात सुरु असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढ्यापुरतं आमचं सरकार मर्यादित नसल्याचं त्यांनी म्हटलंय. तर या सरकारने हेलपाटे शब्द कायमचा बंद केला असल्याची टीकाही केली. इर्शाळवाडी दुर्घटनेवरून आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये जुंपली इर्शाळवाडी दुर्घटनेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंमध्ये शाब्दीक युद्ध पाहायला मिळालं. नुकतेच ठाकरेंनी राज्य सरकारवर टीकास्त्र डागलं होतं. आता मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंच्या इर्शाळवाडी भेटीवरून जोरदार पलटवार केलाय. काहीजण व्हॅनिटी व्हॅनमधून दरडग्रस्तांच्या भेटीला गेल्याची टीका शिंदेंनी केलीय. इर्शाळवाडी दरड दुर्घटनेवरून सुरु झालेलं राजकारण काही थांबायचं नाव घेत नाही. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावरून आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला कायम आहे. शुक्रवारी विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याचं मुद्यावरून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचं नाव न घेता ही खोचक टीका केलीय. वाचा-
महाविकास आघाडीच्या ‘वज्रमूठ’ सभा पुन्हा सुरू होणार; पवारांसह हे दिग्गज नेते मैदानात
इर्शाळवाडी दरड दुर्घटनेनंतर दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री शिंदेंनी घटनास्थळी जावून बचावकार्याची पाहाणी केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही इर्शाळवाडीला भेट दिली होती. मात्र, डोंगराच्या कपारीला असलेल्या इर्शाळवाडीत जाण्याऐवजी डोंगराच्या पायथ्याशी आश्रय घेतलेल्या दरडग्रस्तांची त्यांनी भेट घेतली होती. त्याच मुद्यावरून मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. शिंदेंच्या या टीकेवर ठाकरेंच्या पक्षानं प्रत्युत्तर दिलंय.

इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झालीय. त्या दुर्घटनेतून बचावलेल्या दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. सीडको मार्फत इथल्या रहिवाशांना घरं बांधून देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. खरंतर लवकरात लवकर इर्शाळवाडी दरडग्रस्तांचं पुनर्वसन करण्याची आवश्यता आहे. कारण दरड कोसळल्यानंतर इथले रहिवासी अंगावरच्या कपड्यानिशी घराबाहेर पडले होते. त्यांच्या जवळ ना घर उरलंय ना संसार. त्यामुळे पुनर्वसनाचं काम युद्धपातळीवर करण्याची आवश्यकता आहे. मात्र, त्यावरून राजकारण जोमात असल्याचं चित्र आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  • First Published :



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *