संभाजी भिडेंच्या विधानाचे अधिवेशनात पडसाद, काँग्रेसने केली अटकेची मागणी


मुंबई, 28 जुलै : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी आपल्या वेगवेगळ्या विधानांमुळे कायम चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा भिडे गुरुजी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून खळबळ उडवून दिली. यावेळी त्यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं. त्यांच्या विधानाचे पडसाद आज अधिवेशनात उमटले. त्यांच्या वक्तव्यावरून पृथ्वीराज चव्हाणांनी राज्य सरकारला रोखठोक सवाल विचारले. विधानसभेत काँग्रेसच्या आमदारांनी सरकारला धारेवर धरलं. राष्ट्रपिता महात्मा गांधींचं अवमान करणारे संभाजी भिडे बाहेर कसे फिरू शकतात? काही प्रतिक्रिया उमटल्या तर त्याला कोण जबाबदार असेल? असा सवाल पृथ्वीराज चव्हाणांनी उपस्थित केला. तसंच महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेंना अटक करण्याची मागणी पृथ्वीराज चव्हाणांनी केली. यावर चौकशी करुन योग्य कार्यवाहीची ग्वाही सरकारनं दिली.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे या आधीही अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करून वादात अडकले आहेत. त्यामुळे संभाजी भिडेंना टीकेचं धनीही व्हावं लागलंय. त्यामुळे संभाजी भिडेंवर राज्य सरकार आता काय कारवाई करणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. काय केलं होतं विधान? संभाजी भिडे यांनी अमरावतीच्या एका सभेत खळबळजनक वक्तव्य केल्यामुळे नव्या वादाची ठिणगी उठाली. महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितल्या जाते, परंतु करमचंद गांधी हे मोहनदासचे खरे बाप (वडील) नसून मोहनदास हे ज्या मुस्लिम जमीनदाराकडे कामावर होते. तो मुस्लिम जमीनदार हाच मोहनदासचा खरा बाप असल्याचे खळबळजनक आणि वादग्रस्त विधान संभाजी भिडे यांनी केल्याचा दावा केला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  • First Published :



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *