दत्ता सामंत हत्या प्रकरणी पुराव्याअभावी गँगस्टर छोटा राजनची निर्दोष मुक्तता


मुंबई, 28 जुलै : कामगार नेते दत्ता सामंत हत्या प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन आणि गँगस्टर छोटा राजनची सर्व आरोपातून मुक्तता करण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने हा निकाल दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. या प्रकरणी छोटा राजनला निर्दोष ठरवण्यात आलं आहे. या खटल्यातील तो एकमेव आरोपी होता. यापूर्वी दोन आरोपींना न्यायालयानं दोषी ठरवलं होतं. विशेष सीबीआय न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी हाय-प्रोफाइल डॉक्टर दत्ता सामंत खून खटल्यातील गुंड छोटा राजनची “पुष्टीकारक पुराव्याअभावी” सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. दत्ता सामंत हत्या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष CBI कोर्टात आज सुनावणी पार पडली. न्यायाधीश ए एम पाटील यांनी या प्रकरणाचा निकाल दिला आहे.  प्रमाणित पुराव्यांच्या अभावी राजेंद्र निकाळजे अर्थात छोटा राजन निर्दोष सुटका करण्यात आली आहे. 16 जानेवारी 1997 रोजी डॉ. दत्ता सामंत पवई ते घाटकोपरच्या पंतनगर येथे जात असताना पद्मावती रोडवर त्यांच्यावर हल्ला झाला होता. पोलिसांच्या माहितीप्रमाणे 4 अज्ञात आरोपी बाईकवर आले होते. त्यांनी दत्ता सामंत यांची गाडी रोखली आणि त्यांच्यावर जवळपास 17 गोळ्या फायरिंग करून निर्घृण हत्या केली होती. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची दत्ता सामंत हत्या प्रकरणातून सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या खटल्यातील तो एकमेव आरोपी होता. यापूर्वी दोन आरोपींना न्यायालयानं दोषी ठरवलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  • First Published :



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *