राजा मायाल, वसई, 28 जुलै: देशभरात पावसानं हजेरी लावली असून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. या सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक भागांत पाणी साचलं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक गावं, रस्ते पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशातच अतिमुसळधार पावसाचे अनेक व्हिडीओ, फोटो व्हायरल होत आहेत. अशातच एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये पावसाच्या पाण्यात फॉर्च्युनर गाडी अडकली. कारला बाहेर काढतानाचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. वसईच्या तुंगारेश्वर जंगलातील नदीच्या प्रवाहात फॉर्च्युनर कार अडकल्याची घटना समोर आली आहे. काल दुपारी तीनच्या सुमारास ची ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. मुसळधार पडणा-या पावसानं तुंगारेश्वर जंगलातील नदीचे पाण्याला पूर परिस्थिती निर्माण झाल्यानं ही घटना घडली.
News18लोकमत
नदीच्या पाण्यात अडकलेल्या फॉर्च्युनर कारला बाहेर काढण्यासाठी ट्रॅक्टर बोलवाला लागला. कारला दोरी बांधून ट्रॅक्टरने ओढत कारला बाहेर काढलं. हे दृश्य कॅमेऱ्यात कैद केलं असून याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
पूराच्या पाण्यात फॉर्च्युनर अडकली, पुढे घडलं असं की….पाहा VIdeo#palghar #mumbai #rain #news18lokmat pic.twitter.com/CTvhvSTFhr
— News18Lokmat (@News18lokmat) July 28, 2023
दरम्यान, पालघरमध्ये अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे. लोकांना येण्या-जाण्यास मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एवढंच नाही तर या पाण्यात अनेक वाहनेही वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे काही भागांत रेड अलर्टही देण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.