मुंबई, 28 जुलै, चंद्रकांत फुंदे : मोठी बातमी समोर येत आहे. राज्यात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. पुढेही काही दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर दहावी बोर्डाचा आजच पेपर रद्द करण्यात आला आहे. बोर्डाच्या सचिव अनुराधा ओक यांनी याबाबत माहिती दिली आहे. यासंदर्भात बोर्डाकडून एक प्रसिद्धीपत्रक देखील जारी करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षा घेतल्या जात आहेत. दिनांक 18 जुलै ते 1 ऑगस्ट 2023 या कालावधीमध्ये दहावीची पुरवणी परीक्षा तर 18 जुलै ते 10 ऑगस्ट 2023 या कालावधीत बारावीची पुरवणी परीक्षा होत आहेत. या पुरवणी परीक्षासंबधिचं वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर देखील प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
मात्र राज्यातील काही जिल्ह्यांना आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यानं बोर्डाकडून आजचा दहावीचा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता हा पेपर सुधारीत वेळापत्रकानुसार गुरुवा तीन ऑगस्ट रोजी सकाळी आकरा ते दुपारी एक वाजेच्या दरम्यान होणार आहे. आज दहावीचा इतिहास आणि राज्यशास्त्राचा पेपर होता, मात्र अतिवृष्टीच्या इशारामुळे आता हा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. याबाबत बोर्डाकडून एक प्रसिद्धी पत्रक देखील जारी करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :