रायगड, 28 जुलै, प्रमोद पाटील : घरांवर दरड कोसळून रायगड जिल्ह्यातील इशार्ळवाडीमध्ये मोठी दुर्घटना घडली होती. या अपघातामध्ये 27 जणांचा मृत्यू झाला, तर अद्यापही अनेकजण बेपत्ता आहेत. या घटनेला दहा दिवस पूर्ण झाले आहेत. आज या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींचा दहावा आहे. या घटनेतील मृत व्यक्तींचा दहावा सर्वाजनिक स्वरूपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, कार्यक्रमाची तयारी सुरू झाली आहे. इशार्ळवाडीच्या दुर्घटनेला दहा दिवस झाले आहेत, या घटनेत बेघर झाल्यानंतर सुरुवातीला काही दिवस या आदिवासी बांधवांना जे. एम. म्हात्रे यांच्या चॅरिटेबल संस्थेच्या पंचायतन मंदिरात निवारा भेटला. त्यानंतर चौक येथे तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या कॉलनीमध्ये सर्वांना आणले गेले. अद्यापपर्यंत त्या कॉलनीचे काम सुरू आहे.
धक्कादायक! सर्पदंशामुळे चिमुकलीचा मृत्यू; …तर वाचला असता जीव
दरम्यान आज या घटनेला दहा दिवस पूर्ण झाले आहेत. या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींचा दहावा सामुदायिकरित्या केला जाणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर तयारीला वेग आला आहे. हार-फुले, पुजेच्या विधीचं सामान, ज्याचा मृत्यू झाला आहे, त्याचा फोटो अशा पद्धतीच्या विधीची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे. तसेच मुंडण करण्यासाठी नाभिक आणि वहातुकीसाठी वाहनं आणि भोजनाची व्यवस्थादेखील प्रशासनाकडून मोफत करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :